रितेश देशमुख दिग्दर्शित वेड चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर २३ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी बाकीच्या चित्रपटांचे स्क्रीन हटवून वेड चित्रपटाला देऊ केले. चित्रपट समीक्षक आणि काही जाणकारांनी चित्रपट १०० कोटींचा पल्ला गाठणार असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल रितेशने आभार मानले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन तर जेनेलियाने मराठी नायिका म्हणून पदार्पण केले आहे. एकीकडे या दोघांच्याही कामाचं कौतुक होत आहे. मात्र दुसरीकडे तिला धड मराठी सुद्धा बोलता येत नाही अशी टीका सुद्धा करण्यात येऊ लागली.
जेनेलियाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीला ही संधी का नाही दिली, असा प्रश्न केला जात आहे. जेनेलियाचा अभिनय अप्रतिम आहे, मात्र मराठी भाषेवर तिचे फारसे प्रभुत्व नाही असे टीकाकारांनी म्हटले आहे. त्यामुळे जेनेलियाला ही भूमिका का दिली? हा प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा रितेश म्हणतो की, जेनेलियाने आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेतून काम केलं आहे. महाराष्ट्राची सून म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्यांची खूप अगोदरपासूनच एक ईच्छा होती की मुख्य भूमिका असलेला एक तरी मराठी चित्रपट आपण करायचा. आणि म्हणूनच त्यांनी वेड चित्रपटात श्रावणीची भूमिका साकारली. प्रॉपर डबिंग आर्टिस्ट कडून डायलॉग रेकॉर्ड करणे सहज शक्यही होतं, मात्र त्यांनी तसं केलं नाही. श्रावणीचं पात्र लोकांना आपलंसं वाटलं पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःच या भूमिकेला आवाज दिला.
मी म्हणतो की त्या या परीक्षेत पास सुद्धा झाल्या. चित्रपटात त्या उत्तम मराठी बोलल्या आहेत आणि त्यांचा अभिनय सुद्धा एवढा छान झाला आहे की तो पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल. वेड चित्रपटाच्या निमित्ताने रितेश जेनेलिया बद्दल नेहमी भरभरून बोललं जातं. ह्या गुणी जोडप्याचे संस्कार त्यांच्या मुलांनी अंगिकारावे यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. त्याचमुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. मराठी चित्रपट सृष्टीला या जोडीने एक नवीन वळण दिले आहे. या दोघांनी अजून चित्रपट मराठी सृष्टीला मिळवून द्यावेत अशी अपेक्षा केली जात आहे. वेड चित्रपट पाहून बऱ्याच प्रेक्षकांनी एक सुंदर प्रेमकथा पाहायला मिळाली अशी प्रतिक्रिया दिली आहे. यात कुठलाही अश्लीलपणा जाणवला नसल्याने अशा चित्रपटांचे प्रेक्षकांनी स्वागतच केलेले आहे.