विराजस कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे हे मराठी सृष्टीतील नवविवाहित दाम्पत्य आता व्यवसाय क्षेत्रात जम बसवताना पाहायला मिळत आहेत. अभिनय क्षेत्रासोबत कलाकार मंडळी वेगळ्या क्षेत्रांचा विचार करतात. यातील बहुतेक कलाकारांनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. विराजस आणि शिवानी यांनी देखील अशा व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. रफुचक्कर या ब्रँडशी संगनमताने विराजस आणि शिवानी या दोघांनी खास नाटक प्रेमींसाठी डिझाइन केले. विरानीचे थिएटर थीम असलेले टीशर्टस बाजारात उपलब्ध करून दिले आहेत.
शांतता नाटक चालू आहे, कॉर्नरची २, ब्याकस्टेज आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा मेसेजेसच्या संकल्पना विरानी टी शर्टच्या माध्यमातून मांडल्या आहेत. नाटक प्रेमींना त्यांची ही आगळी वेगळी संकल्पना निश्चितच आवडली आहे आणि त्याला मागणी देखील वाढू लागली. मृणाल कुलकर्णी यांनी देखील आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या व्यवसायाचं मोठं कौतुक केलेलं आहे. काय एकेक मस्त आयडिया काढतात पोरं! चला, आता वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायची, याची चिंता मिटली! असे म्हणत त्यांनी दोघांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या आहेत. विरानीच्या या नव्या ब्रँडला तुमच्याही आशीर्वादाची गरज आहे असे म्हणत शिवानीने आपल्या चाहत्यांना या नव्या व्यवसायाची ओळख करून दिली. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत विराजसने सुरुवातीला सहाय्यक दिग्दर्शन म्हणून भूमिका पार पाडली होती.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच विराजस नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन करत असे. इथूनच त्याने थिएटरऑन या नाट्यसंस्थेची निर्मिती केलेल्या नाट्यसंस्थेला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनाही नाटकाची आवड असल्याने याच थीमची संकल्पना मांडत टीशर्टची डिझाइन तयार केली. नाट्य प्रेमींना हे टीशर्टस नक्कीच आवडतील असा विश्वास त्यांना आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची देखील गरज आहे असे ती म्हणते. विराजस दिग्दर्शित करत असलेला व्हिक्टोरिया हा आगामी चित्रपट येत्या १६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, आशय कुलकर्णी, हिरा सोहल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. व्हिक्टोरिया हा चित्रपट सस्पेन्स आणि हॉरर असणार आहे त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.