Breaking News
Home / मराठी तडका / विजू माने यांनी बायकोचा वाढदिवस साजरा केला खास.. कसा ते बघा
writer director viju mane
writer director viju mane

विजू माने यांनी बायकोचा वाढदिवस साजरा केला खास.. कसा ते बघा

गोजिरी, खेळ मांडला, पांडू यासारख्या सिनेमाचे दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या पत्नीला नुकतीच वाढदिवसाची गिफ्ट दिली. खरं तर ती गिफ्ट म्हणजे साडी किंवा दागिना नसूनही पत्नी अनघा प्रचंड खुश झाली. असं काय दिलं गिफ्ट म्हणून ते एकदा बघाच. ​बायकोच्या वाढदिवसाची आठवण आणि तिच्यासाठी छान गिफ्टची निवड या ​​दोन्ही गोष्टी जो नवरा न चुकता करतो, त्याला आयुष्यात काहीही कमी पडत ​​नाही. हा अनुभव प्रत्येक नवऱ्याच्या गाठीशी असेल. मग ते सर्वसामान्य नवरे असोत किंवा सेलिब्रिटी. बायकोच्या वाढदिवशी गिफ्ट काय द्यायचे हा विचार त्यांनाही गोंधळून टाकतो. पण मराठी सिनेविश्वातील दिग्दर्शक विजू माने यांनी पत्नी अनघाच्या वाढदिवशी खास गिफ्ट दिलं.

writer director viju mane
writer director viju mane

गिफ्ट असं दिलं की ती वस्तू अनघा वापरणार नसली तरी तिला त्याचा खूप आनंद झाला. पत्नी अनघा आणि तिला दिलेलं गिफ्ट यांच्यासोबत विजू माने यांनी तो क्षण साजरा करणारा फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या पांडू सिनेमाचा आजचा चेहरा मांडणाऱ्या विजू माने यांच्या दिग्दर्शनातील चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सतत नवे प्रयोग करणारा दिग्दर्शक अशी त्यांची खास ओळख आहे. बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर विजू माने यांचा पांडू हा सिनेमा गेल्या वर्षी पडदयावर झळकला. कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची धमाल हवालदार जोडी. आणि त्यांच्यासोबत सोनाली कुलकर्णीची केळेवाली प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. निखळ मनोरंजनाची ही मेजवानी प्रेक्षकांना खूप आवडली.

viju mane anagha mane
viju mane anagha mane

नुकताच या सिनेमाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्डही मिळाला. विजू माने यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण ठरला. योगायोगाने त्याच दिवशी त्यांची पत्नी अनघा यांचा वाढदिवसही होता. त्यामुळे बायकोला काय गिफ्ट द्यायची हा विचार करणाऱे विजू माने यांनी तो पुरस्कारच बायकोला दिला. अनघालाही तिच्या आजपर्यंतच्या सगळया वाढदिवसाच्या गिफ्टपैकी विजू यांना मिळालेला हा पुरस्कार गिफ्ट म्हणून खूप् आवडला. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर अनघासोबत हा आनंद साजरा करत विजू माने यांनी अनोखं गिफ्ट बायकोला दिलं. विजू माने आणि अनघा यांचा प्रेमविवाह आहे. कॉलेजमध्ये ज्या नाटकाचं दिग्दर्शन विजू करत होते त्या नाटकात अनघा काम करत होत्या.

कॉलेजमध्ये एकत्र काम करताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. विजू अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात आहे तर अनघा फार्मा कंपनीत नोकरी करते. पण विजूचा रागीट स्वभाव, नात्यांमध्ये फार न गुंतण्याची सवय, सततचे दौरे हा सगळा व्याप अनघाने छान सांभाळला. विजू नेहमीच अनघाचं कौतुक करतात. आता तर पांडू सिनेमासाठी मिळालेल्या पुरस्काराचं श्रेय अनघाला देत विजू यांनी तिला वाढदिवसाची दिलेली ही गिफ्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या या गोड क्षणांचे कौतुक करीत मराठी सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.