Breaking News
Home / जरा हटके / १६-१७ वर्षे झाली अजूनही त्या तशाच आहेत.. मिलिंद गवळी यांनी सांगितली खास आठवण
varsha usgaonkar milind gawali
varsha usgaonkar milind gawali

१६-१७ वर्षे झाली अजूनही त्या तशाच आहेत.. मिलिंद गवळी यांनी सांगितली खास आठवण

​एक अभिनेता म्हणून मराठी सृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळते. त्यातून क्वचित प्रसंगीच एखाद्या नायिके सोबत वारंवार काम करण्याची संधी उपलब्ध होते. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत मिलिंद​​ गवळी यांना देखील सिया पाटील, प्रज्ञा जाधव, स्मिता शेवाळे, शिल्पा तुळसकर, दीपाली भोसले, सुलेखा तळवळकर, वर्षा उसगांवकर अशा नायिकांसोबत काम करता आले. अशातच काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीच्या एका इव्हेंटमध्ये मिलिंद गवळी आणि वर्षा उसगांवकर यांची भेट घडून आली. २००६ साली एका गाण्यात मिलिंद गवळी यांनी वर्षा उसगांवकर सोबत काम केले होते. त्यामुळे तब्बल १६ ते १७ वर्षानंतरची त्यांची ही भेट अविस्मरणीय ठरली.

varsha usgaonkar milind gawali
varsha usgaonkar milind gawali

यावेळी मिलिंद यांनी वर्षा यांच्यासोबत एक सेल्फी काढून घेतला. आणि सोबतच १६ वर्षांपूर्वीचा त्यांच्यासोबत काम केल्याचा एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून मिलिंद गवळी यांनी आठवणींना उजाळा देत म्हटले आहे की, प्रवाह पिक्चरच्या मुहूर्ताच्या प्रसंगी त्या सोहळ्याच्या वेळेला अनेक दिग्गज कलाकारांच्या भेटी झाल्या. या सगळ्या महान कलाकारांबरोबर मला काम करायचं भाग्य मिळालं होतं. अशा प्रसंगी त्यांच्या भेटीगाठी होतात याचा फार मला आनंद होतो. नाहीतर एकदा एका कलाकाराबरोबर आपण काम केलं, तो चित्रपट किंवा ती सीरियल पूर्ण झाली की त्यानंतर किती वर्षांनी आमची भेट होईल याची काही शाश्वती नसते. सुलेखा तळवलकर बरोबर जेव्हा “आई” चित्रपट केला.

varsha priya bapat milind gawali
varsha priya bapat milind gawali

नंतर जवळजवळ २२ वर्षानंतर आम्ही एकत्र “तु अशी जवळी रहा” ही मालिका केली. अर्चना पाटकर “सुन लाडकी सासरची” मध्ये माझी आई होत्या. आता २५ वर्षानंतर “आई कुठे काय करते” या मालिकेत एकत्र काम करतोय. असे अनेक कलाकारांबरोबर वर्ष वर्ष भेटी होत नाहीत. काल वर्षाताईं बरोबर स्टार प्रवाहच्या इव्हेन्ट मध्ये माझा आणि त्यांचा फोटोशूट झाला. फोटोशूट करत असताना आठवलं की २००६ मध्ये आम्ही एकत्र महेश टिळेकर यांच एक गाणं केलं होतं. त्यानंतर आम्ही सोळा सतरा वर्षे एकत्र कामच केलं नाही. मी सेल्फी काढला लगेच, कारण परत किती वर्षांनी आम्ही भेटू माहित नाही. पण १७ वर्ष मी वर्षाताईंना बघतो आहे त्या तशाच आहेत Very Graceful, त्यांना खूप खूप शुभेच्छा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.