३ जून २०२२ रोजी ‘मेजर’ हा चित्रपट तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला आहे. २००८ सालच्या मुंबई अटॅकमध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन शहिद झाले होते. त्यांच्या जीवनावर मेजर हा बायोपिक बनवण्यात आला आहे. दाक्षिणात्य अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले आदीवी शेष मेजर संदीप यांची भूमिका साकारणार आहेत. तर सई मांजरेकर त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार माहेशबाबू यांच्या निर्मिती संस्थेतून हा चित्रपट निर्मित केला आहे.
सोमवारी चित्रपटाच्या ट्रेलरच्या लॉन्चवेळी महेश बाबूला काही वार्ताहरांनी बॉलिवूड चित्रपटात येण्याबाबत विचारले असता महेश बाबूंनी धक्कादायक वक्तव्य केलेले पाहायला मिळाले. ‘मी एक मोठा स्टार आहे केवळ अशी ओळख मला निर्माण करायची नाही. तर मी दाक्षिणात्य चित्रपट सर्वत्र कसे लोकप्रिय होतील याकडे जास्त लक्ष्य केंद्रित करत असतो. मी कायमच तेलगू चित्रपटातून काम केले आहे आणि ते भारतभर ओळखले जावेत अशी माझी ईच्छा आहे. आणि आता हे सगळं घडून येतंय त्यामुळे मी खूपच खुश आहे. तेलगू चित्रपट माझी ताकद आहे. यांनीच आता बॉलिवूड, टॉलिवूड सारखे राष्ट्रीय चित्रपट म्हणून एक ओळख मिळवली आहे. मला बॉलिवूड सृष्टीतून अनेक प्रस्ताव मिळाले परंतु मला वाटतं की बॉलिवूड सृष्टीला मी परवडणार नाही.
त्यामुळे इथे मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. तेलगू चित्रपटाने मला जे प्रेम दिलं, जे स्टारडम दिलं त्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. मी फक्त चित्रपट करत होतो, प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं. एक विश्वास दिला यापेक्षा अजून जास्त काय हवं’. असे महेश बाबू सोमवारी पार पडलेल्या लॉन्च सोहळ्यात बोलत होते. दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बॉलिवूड सृष्टीला धोका निर्माण झाला आहे हे आता सर्वांना कळून चुकले आहे. त्यामुळे बॉलिवूड सृष्टीत मी माझा वेळ का घालवू असे महेश बाबूंचे वक्तव्य बॉलिवूड वाल्यांना विचार करायला लावणारे ठरले आहे. दाक्षिणात्य चित्रपट आता पाच सहाशे कोटी नव्हे तर हजार कोटींच्या घरात जाताना पाहायला मिळत आहेत. हेच या चित्रपटांचे खरे यश म्हणावे लागेल.