एक मोहोर अबोल या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेली अभिनेत्री खुशबू तावडे साळवी हिने प्रथमच आपल्या बाळाचा क्युट फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी यांना २ नोव्हेंबर २०२१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. राघवच्या जन्मानंतर तब्बल चार महिन्यांनी त्याचा फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. खुशबू तावडेने अभिनयासोबतच हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले आहे. एक मोहोर अबोल, देवयानी, पारिजात, धर्मकन्या, मेरे साईं, तेरे बिन, आम्ही दोघी, सावन अशा हिंदी मराठी मालिकेतून खुशबू महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. तर संग्राम साळवी याने देवयानी, कुलस्वामिनी, सरस्वती, कन्यादान मालिकेतून काम केले आहे.
देवयानी या मालिकेतील तुमच्यासाठी कायपण या डायलॉगमुळे संग्रामला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. देवयानी या मालिकेतून एकत्रित काम करत असताना खुशबू सोबत त्याची ओळख झाली आणि या ओळखीचे पुढे लग्नात रूपांतर झाले. हे दोघेही २०१८ साली मोठ्या थाटात विवाहबंधनात अडकले. ‘साईड वॉक कॅफे’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. खुशबू आणि संग्राम हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेले पाहायला मिळाले मात्र बाळाचा फोटो ते नेहमी पाठमोरा दाखवायचे. बहुतेक कलाकार हे आपल्या बाळाबाबत नेहमीच सिक्युअर असलेले पाहायला मिळतात ही भावना अगदी बॉलिवूड कलाकारांमध्ये देखील पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लेकीचा व्हिडीओ प्रथमच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कॅमेऱ्यासमोर आपले बाळाचे फोटो येऊ नये म्हणून ते नेहमीच काळजी घेताना दिसले होते. मात्र त्यानंतरही वामीकाचा स्टेडियमवर टाळ्या वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळाला. बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा देखील तिच्या लेकीबाबत सिक्युअर असलेला पाहायला मिळाला. एवढेच नाही तर मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर ही देखील आपल्या दोन्ही जुळ्या मुलींना कॅमेऱ्यापासून दूर ठेवताना दिसते. अर्थात या कलाकारांच्या चाहत्यांना त्यांची मुलं कशी दिसतात याची उत्सुकता लागून राहिलेली असते. परंतु काही सुरक्षेच्या कारणास्तव ही कलाकार मंडळी आपल्या मुलांना एक्सपोज करणे गरजेचे मानत नाहीत. परंतु योग्य वेळी ते आपल्या चाहत्यांची ईच्छा पूर्ण करतात, तशीच ईच्छा खुशबू आणि संग्रामने देखील पूर्ण केलेली पाहायला मिळाली.