माहेरची साडी शुभ बोल नाऱ्या, लपवा छपवी, वहिनीची माया, लेक चालली सासरला. या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटातून अलका कुबल यांनी एक सशक्त नायिका म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत स्वताची ओळख निर्माण केली. सिनेमॅटोग्राफर असलेल्या समीर आठल्ये यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. ईशानी आणि कस्तुरी या दोन मुली त्यांना आहेत. अलका कुबल यांची थोरली लेक ईशानी आठल्ये नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच ईशानी आणि निशांत वालिया यांच्या लग्नाचा सोहळा थाटात पार पडला. ईशानीच्या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

अगदी किशोरी शहाणे, प्राजक्ता कुलकर्णी दिघे, प्रेमा किरण, निर्मिती सावंत, स्मिता जयकर, अर्चना नेवरेकर, मिलिंद गवळी, अशोक शिंदे अशा कलाकारांची मांदियाळी. ईशानीच्या लग्नाला आणि रिसेप्शनला उपस्थिती लावून गेली होती. अलका कुबल यांची लेक ईशानी अभिनय क्षेत्रात न येता एका वेगळ्याच क्षेत्रात जाऊन गगनभरारी घेत आहे. लहानपणापासून ईशानी पायलट बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून होती. त्यामुळे त्यादिशेनेच तिने आपली पावले त्या क्षेत्राकडे वळवली होती. ईशानी ही व्यावसायिक पायलट आहे. २०१७ साली ईशानीने विमान चालवण्याचे लायसन्स मिळवले होते. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी पायलट झाली म्हणून तिचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले होते.

आपल्या आईप्रमाणे अभिनय क्षेत्रात न येता ईशानीने वेगळ्या क्षेत्रात जाण्याचे धाडस दाखवल्याने तिची वाहवा होत होती. ईशानीचा नवरा निशांत वालिया हा देखील पायलट आहे. या दोघांची ओळख याच क्षेत्रामुळे घडून आली होती. दोघांचे एकत्रित असलेले फोटो त्यांनी सोशल मीडियावर याअगोदर शेअर केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासूनचे हे मित्र आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. निशांत वालियाचे कुटुंब दिल्लीत वास्तव्यास आहे. सोशल मीडियावर अलका कुबल यांच्या लेकीच्या लग्नातले फोटो व्हायरल होत आहेत. लग्नाला शुभप्रसंगी सर्व रसिक चाहते आणि कलाकारांनी ईशानीला शुभेच्छा दिल्या आहेत.