Breaking News
Home / मालिका / ​छोट्या उस्तदांच्या मैफिलीत आता सचिन पिळगावकर देखील करणार कल्ला
sachin pilgaonkar navri mile navryala movie
sachin pilgaonkar navri mile navryala movie

​छोट्या उस्तदांच्या मैफिलीत आता सचिन पिळगावकर देखील करणार कल्ला

​आपल्या भारत भूमीला आजवर अनेक मोठे संगीतकार लाभले आहेत. संगीताच्या दुनियेत आपला एक वेगळा इतिहास आहे. संगीत ही अशी कला आहे जिच्यासाठी अनेक कलावंतांनी आपलं आयुष्य वे​​चलं आहे. अशात काही छोट्या संगीतकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमात पहिल्या दिवसापासून अनेक बाल संगीतकारांच्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला. या शोमध्ये कायमच बाल कलाकार आपल्याला गाताना दिसले. मात्र आता दिग्गज अभिनेते आणि गायक सचिन पिळगावकर देखील हा मंच गाजवताना दिसणार आहेत.

sachin supriya pilgaonkar
sachin supriya pilgaonkar

स्टार प्रवाह चायनलच्या इंस्टाग्राम अकाउंट एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सचिन पिळगावकर एक सुंदर आणि दमदार गाणं गाताना दिसत आहेत. त्यांच्या ठसकेदार सुरांनी त्यांनी ‘अलबेला आला’ हे गाणं गायलं आहे. यावेळी मंचावर दोन छोट्या संगीतकारांसह सिद्धार्थ चांदेकर देखील दिसत आहे. गाण्याच्या तालावर वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे मस्त एन्जॉय करताना दिसत आहे. सचिन यांनी गायलेलं हे गाणं त्यांच्याच ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटातलं आहे. ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमातील सचिन यांचा हा व्हिडिओ शनिवार रविवार रात्री ९ वाजता रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ala jayram ala song
ala jayram ala song

सचिन पिळगावकर यांनी आजवर या सिनेसृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट आणि गाणी दिली आहेत. ज्यामध्ये मराठीसह हिंदी गाण्यांचा देखील समावेश आहे. त्यांचं ‘बडे अच्छे लगते है’ हे गाणं देखील खूप गजल होतं. तसेच ‘गुंजा रे चंदन’, ‘कई दीन से मुझे’, ‘एक दीन तुम बहुत बडे बनोगे’, ‘ही नवरी असली’ अशी अनेक गाणी आजही प्रेक्षक आवडीने ऐकतात. तसेच आता पुन्हा एकदा ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या कार्यक्रमात त्यांच्या आला जयराम आला या गाण्याची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.