आई कुठे काय करते या मालिकेत गौरीची आई म्हणजेच रजनी कारखानीसची भूमिका निभावणारी अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुषमा मुरुडकर यांच्या वडिलांचे म्हणजेच जयवंत मुरुडकर यांचे रविवारी २ जानेवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले आहे. वडिलांच्या निधनाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर कळवली आहे. या दुःखद बातमीनंतर अनेक कलाकारांनी त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुषमा मुरुडकर या मूळच्या मुंबईच्या, मुंबईतच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. यांनी आई कुठे काय करते या मालिकेत गौरीची आई हे दमदार पात्र साकारले होते. अनिरुद्धला धडा शिकवण्यासाठी हे पात्र मालिकेत दाखल झाले होते त्यावरून त्यांच्या दमदार एंट्रीचे प्रेक्षकांनी स्वागत केले होते. अशी कुठे काय करते या मालिके अगोदर त्यांनी हिंदी मालिका सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली होती. कुंडली भाग्य, कहाँ हम कहाँ तुम , लाल ईश्क, ये है मोहब्बतें, कसौटी जिंदगी की या मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्या हिंदी मालिकेत स्थिरावल्या होत्या. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत त्यांनी गौरीची आई रजनी कारखानीसची भूमिका मिळाली होती.
अनिरुद्धच्या कंपनीच्या त्या सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळताना दिसल्या त्यावेळी अनिरुद्ध आणि संजना विरोधात त्यांनी पाऊल उचलले होते. ही भूमिका गाजवल्यानंतर सुषमा मुरुडकर यांनी कलर्स मराठीवरील बायको अशी हवी या मालिकेत रंजना राजशिर्के ही महत्त्वाची भूमिका निभावली होती. या मालिकेत विकास पाटील मुख्य भूमिकेत दिसला होता. बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनच्या येण्याने मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळाला होता. परंतु आपल्या आयुष्यात आणखी एक महत्वाचे पात्र साकारण्याची संधी मिळाल्याने सुषमा मुरुडकर यांच्यासाठी ही भूमिका अधोरेखित करणारी ठरली होती. मिसेस डिसुझा, डॉ रेणुका शर्मा, रजनी कारखानीस आणि रंजना राजशिर्के या भूमिकांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.