Breaking News
Home / मालिका / मराठी बिग बॉसच्या शो मध्ये गाजलेल्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री
actress new serial aboli
actress new serial aboli

मराठी बिग बॉसच्या शो मध्ये गाजलेल्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री

स्टार प्रवाहवरील अबोली ही नव्याने सुरू झालेली मालिका प्रेक्षकांच्या हळूहळू पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत सचित पाटील अंकुश शिंदेच्या भूमिकेत दिसत आहे तर अबोलीची भूमिका गौरी कुलकर्णीने साकारली आहे. या मालिकेत लवकरच एका अभिनेत्रीची एन्ट्री होत आहे. सोनिया केस मध्ये अबोलीला आयविटनेस म्हणून चौकशीसाठी भर लग्न मंडपातून नेण्यात आले आहे. त्यामुळे कोर्टात वकिलाची भूमिका बजावण्यासाठी मालिकेत अभिनेत्री रेशम टिपणीसची एन्ट्री होणार आहे. रेशम टिपणीस हिने मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये हजेरी लावली होती. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्या प्रेमप्रकरणावरून बिग बॉसचा पहिला सिझन खूपच चर्चेत आला होता.

actress resham tipnis
actress resham tipnis

राजेश शृंगारपुरे विवाहित असूनही तो रेशम टिपणीसशी जवळीक साधताना पाहायला मिळाला होता. मात्र बिग बॉसचा पहिला सिजन संपला त्यानंतर हे दोघेही पुन्हा फारसे एकत्रित पाहायला मिळाले नाही. दरम्यान हा सर्व प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेण्यासाठीचा स्टंट असावा असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला आणि विषय संपवला. १९९२ साली तुषार दळवी आणि रेशम टिपणीसने ‘जिवलगा’ हा मराठी चित्रपट साकारला होता. त्यानंतर रेशम अनेक मराठी चित्रपटासोबतच हिंदी चित्रपटात देखील झळकली. बाजीगर चित्रपटात तिने महत्वाची भूमिका बजावली होती. तू तू मै मै, आधार, मृगजळ, हत्यार, श्रीमान श्रीमती, क्यूँ की सास भी कभी बहू थी, वो रेहनेवाली मेहलोंकी अशा अनेक मालिका आणि चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. १९९३ साली हिंदी मालिका अभिनेता संजीव सेठ याच्याशी तिने विवाह केला. मात्र २००४ साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

actress resham tipnis new serial
actress resham tipnis new serial

रेशमला मानव आणि रिशिका ही दोन अपत्ये झाली. रेशमची मुलगी रिशिका सेठ हिला फोटोग्राफीची आवड आहे. याशिवाय क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणूनही ती काम करताना दिसते. अबोली या मालिकेतून रेशम टिपणीस छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ११ फेब्रुवारी २०२२ रोजी अंकुश चौधरी, वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लोच्या झाला रे’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रेशम टिपणीस देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी ती मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये गेस्ट म्हणून घरात दाखल झाली होती. अबोली मालिकेत रेशम वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. मालिकेत रेशम छोट्या भूमिकेत झळकणार असली तरी, हे पात्र तितकेच दमदार असणार आहे. या नव्या मालिकेसाठी रेशम टिपणीसला खूप खूप शुभेच्छा!

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.