Breaking News
Home / मालिका / मी एकटी सर्वाइव नाही करू शकत, माझ्यामुळे त्याचा फायदा झालाय.. मिनलच्या भावनांचा फुटला बांध
meenal vikas clash at big boss house
meenal vikas clash at big boss house

मी एकटी सर्वाइव नाही करू शकत, माझ्यामुळे त्याचा फायदा झालाय.. मिनलच्या भावनांचा फुटला बांध

बिग बॉसच्या घरात सदस्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले होते. आपल्या जवळची प्रॉपर्टी वापरून या सदस्यांना त्यापासून काहीतरी क्रिएटिव्हिटी बनवायची होती. त्यात मीराने सोनालीला जोकर सारखे बनवून दाखवले होते तर जयने स्वतःची पॅन्ट कापून त्यापासून वेगळी क्रिएटिव्हिटी तयार केली होती  मात्र मी मिनलने अंतिम निर्णय हा बी टीमच्या बाजूने दिला असल्याने आणि बी टीमची क्रिएटिव्हिटी सरस ठरल्याने बी टीमला विजेता घोषित केले होते. काल विकास आणि मीनल यांच्यात वाद झाले मीनलने ह्या सिजनचा सर्वात अनफेअर डिसीजन घेतला त्यामुळे विकास तिच्यावर रागावला होता. स्वतः परफॉर्म करायची वेळ येते तेव्हा विकास इंडिव्हिज्युअली का खेळला.

meenal vikas clash at big boss house
meenal vikas clash at big boss house

असं म्हणून मीनल विशालला स्पष्टीकरण देत होती, मात्र मिनलच्या डिसीजनवर विकासने तिला कॅप्टन बनली आहेस म्हणून डोक्यावर बसू नको असे म्हणत आणखी वाद वाढवले. विकासाचे हे वागणे पाहून मीनल मात्र दुखावली आहे. आपल्या भावना व्यक्त करून तिने अश्रूंना मोकळी वाट करून दिली. एवढं मनापासून खेळलीये मी ह्या लोकांसाठी, मग मी एकटी सर्व्हाईव्ह नाही करू शकत, माझ्यामुळे त्याचा फायदा झालाय. मिनलच्या ह्या दाटून आलेल्या भावना तिने मोकळ्या केल्या असल्या तरी तिकडे विकास विशालला म्हणत असतो की, ह्या घरात प्रत्येकजण एकटा सर्व्हाईव्ह करू शकतो. विकासच्या ह्या स्पष्टीकरणावर विशाल देखील त्याला साथ देतो, प्रत्येकाने केलंय तू बोलून दाखवतीस त्याला कासया अर्थ आहे. कशाला ग्रुप ग्रुपची नाटकी करायची. मीनल विकास यांच्यात झालेले हे वाद लवकर मिटतील का?

meenal shah vikas patil friendship
meenal shah vikas patil friendship

दरम्यान गायत्री दातार ह्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. मीरा माझी चांगली मैत्रीण आहे आणी तीने छान खेळावं अशी प्रतिक्रिया गायत्रीने दिली होती. यासोबतच विशाल आणि मीनल हे दोन्ही सदस्य खूप चांगले आहेत आणि त्यांचा ग्राफ चढताच राहिला आहे. घरातून बाहेर पडल्यावर मी पाहिल्यादा अक्षय वाघमारेला भेटणार आहे असे तिने म्हटले होते. त्यानिमित्ताने गायत्रीने कालच अक्षयची भेट घेतली होती. तो सुरुवातीचे काही दिवसच बिग बॉसच्या घरात राहिला होता, तरी देखील आमच्यात खूप चांगलं बॉंडिंग झालं होतं. त्यामुळे सर्वात पहीले मी त्याची भेट घेणार, असे गायत्री म्हणाली होती. ह्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार याची उत्सुकता आहे कारण या एलिमीनेशन नंतर बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनचे पाच फायनलिस्ट कोण असणार हे ठरणार आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.