Breaking News
Home / जरा हटके / ‘माझ्या ब्रॅण्डसाठी एक व्हिडिओ करा’.. म्हणणाऱ्या महिलेला भाऊ कदमच्या लेकीनं दिलं सडेतोड उत्तर
mrumayee kadam bhau kadam daughter
mrumayee kadam bhau kadam daughter

‘माझ्या ब्रॅण्डसाठी एक व्हिडिओ करा’.. म्हणणाऱ्या महिलेला भाऊ कदमच्या लेकीनं दिलं सडेतोड उत्तर

येत्या ३ डिसेंबरला चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा पांडू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. एकीकडे मराठी सृष्टीत भाऊ कदम आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांच्या नावाचा उपयोग व्हावा म्हणून वेगवेगळ्या युक्त्या करून, आपल्या ब्रँडची जाहिरात करून घेताना काहीजण पाहायला मिळत आहेत. भाऊ कदम यांची लेक मृण्मयी कदम सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर, युट्युबवर देखील तिचे बरेच चाहते तिला फॉलो करताना दिसतात.

mrumayee kadam bhau kadam daughter
mrumayee kadam bhau kadam daughter

अशाच एका माध्यमातून मृण्मयीला एका फॉलोअर कडून गेल्या आठवड्यात एक रिक्वेस्ट करण्यात आली होती कि, ‘तू तुझ्या वडिलांना सांगून माझ्या ब्रॅण्डसाठी एक व्हिडीओ करायला सांग, मी त्यांच्या मॅनेजरशी बोलले पण तो ह्या व्हिडिओ साठी खूप पैसे मागतोय. तूच तुझ्या वडिलांना बोलून माझ्यासाठी हा व्हिडीओ बनवून पाठव’. मृण्मयीने तिच्या या विनंतीला शांतपणे उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय, ‘कोणाच्याही बोलण्यावरून मी माझ्या वडिलांना  फुकट काम करून देण्यासाठी मी कसं म्हणू,  तुझ्याकडे पैसे असतील तर तू फक्त त्यांच्या मॅनेजरसोबत बोल नाहीतर तुझं हे प्रपोजल ते कसं स्वीकारतील’. मृण्मयीच्या या उत्तरावर त्या महिलेने प्रतिक्रिया दिली की, ‘खरं तर लोक तुम्हाला ओळखतात, माझ्याकडे ह्यासाठी पैसे नाहीत…आज कळलं सगळ्या गोष्टीसाठी पैसे लागतात.. माणुसकीची व्हॅल्यू नाही राहिली.. शेवटी तुम्ही मोठी लोकं आमची कशाला हेल्प करणार’. फॉलोअर्सच्या या प्रतिक्रियेवर मृण्मयी चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली. या प्रतिक्रियेला मृण्मयीने सडेतोड उत्तर देत म्हटले की, ‘सगळ्यांनाच फुकट आपली जाहिरात करून घ्यावीशी वाटते..

mrumayee bhau kadam
mrumayee bhau kadam

जे मला गेल्या अनेक दिवसांपासून फॉलो करत आहेत त्यांच्या छोट्या छोट्या व्यवसायासाठी मी नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिलं आहे, तेही कुठल्या मोबदल्याशिवाय. जे लोक सोशल मीडियावर काम करतात, कंटेंट क्रिएट करतात ज्यांना त्यांच्या ब्रॅंडची प्रसिद्धी करावी वाटते, त्या सर्वांना मी सांगू इच्छिते की तो व्हिडीओ फक्त व्हिडिओ नसतो तर ते त्यांचं काम असतं. एडिटिंग, स्क्रिप्टिंग आणि भरपूर मेहनतीनंतर अखेरीस तो व्हिडीओ पूर्णत्वास येत असतो. आपल्या ब्रॅण्डची प्रसिद्धी करायची आहे तर त्यामागच्या गोष्टी समजून घ्या.. तुम्ही एक दिवस कुठे काम केलं तर त्या मोबदल्यात पगार घेता ना.. मग फुकट जाहिरात करून घेणे थांबवा…’ मृण्मयीच्या या सडेतोड उत्तरावर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचे मोठे कौतुक केले आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.