एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप लावले जात आहेत, त्यात आर्यनला सोडण्यासाठी ८ कोटींची मागणी केली असल्याचेही आरोप लावण्यात आले. हे सर्व घडत असताना समीर वानखेडे यांच्या पत्नीला आणि कुटुंबाला देखील टार्गेट केलं जात असल्याचा दावा अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केला आहे. काहीच दिवसांपूर्वी आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणी एका वृत्त वाहिनीवर क्रांती रेडकरच्या नावाची चर्चा होती. याप्रकरणी क्रांती रेडकरने त्या वृत्त वहिनीला खडसावले देखील होते.
केवळ खोट्या बातम्या छापून तुम्ही आमची प्रतिमा मलिन करत आहात. मी त्या प्रकरणी केस लढली होती आणि निकाल माझ्या बाजूने लागला असताना अशा पद्धतीने आम्हाला टार्गेट करणं कितपत योग्य आहे, केवळ प्रसिद्धी मिळावी म्हणून तुम्ही अशी बातमी छापणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. क्रांती रेडकर हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या बातम्या समोर येत आहेत. जिथे असाल तिथे जाळून टाकण्याच्या धमक्या मला मिळत आहेत असे ती मीडियाशी बोलताना म्हणाली. क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांच्या बाजूने अनेक कलाकार मंडळी पुढे सरसावली आहेत. अभिनेत्री मेघा धाडे, सोनाली खरे, बीजय आनंद यांनी आम्ही समीर वानखेडे यांना सपोर्ट करत आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून समीर वानखेडे यांच्या बाजूने पाठिंबा असल्याचे मेसेजेस क्रांती रेडकरला येत आहेत.
यावर मीडियाशी बोलताना क्रांती म्हणाली, “मला मराठी असल्याचा अभिमान असून महाराष्ट्रातुन, देशभरातून पाठिंब्याचे मेसेज येत आहेत पण मला आणि माझ्या परिवाराला आपल्याच राज्यात कोणीतरी त्रास देत आहे, हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना?” अशी खेदजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी पहिले लग्न केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला याबत क्रांती रेडकरने आपल्या लग्नाचा फोटो शेअर करून मी आणि समीर आम्ही दोघेही हिंदूच आहोत असे म्हटले होते. एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना समीर वानखेडे यांच्या कर्तृत्वाबाबत तिने आदर व्यक्त केला. त्यांना आमच्यासाठी खूप कमी वेळ मिळतो पण मला त्यांचं प्रोफेशन माहीत आहे त्यामुळे मी त्यांच्या कामात कधीच लुडबुड करत नाही, उलट फिरायला कुठे गेलो आणि त्यांना कामासंदर्भात जावं लागलं तर ते पहिलं आपल्या सेवेला प्राधान्य देतात असं तिनं म्हटलं होतं. क्रांती रेडकरच्या या स्पष्टीकरणावर बाहेरच्या राज्यातील लोकांनी देखील समीर वानखेडे यांना आमचा पाठिंबा आहे असेच म्हटले होते.