प्रसार माध्यमे चुकीच्या बातम्या देताना सर्रास पाहायला मिळते, काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिचा पती राजकुंद्राच्या प्रकरणात नावात असलेल्या साधर्म्यामुळे मराठी अभिनेता उमेश कामत यांचे नाव चर्चेत आले होते. बातमीतील सत्य परिस्थिती समोर आल्यानंतर मीडियाने चूक झाली असल्याची कबुली दिली होती. बऱ्याच दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या फोटोवर टाकलेल्या चुकीच्या मजकुरावर प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना ताईंचा चुकीच्या माहितीचा फोटो प्रसिद्ध करणाऱ्या मीडियाला खेडेबोल सुनावताना महेश टिळेकर म्हणतात “गांजा ओढून दारू पिऊन बातम्या देणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जाते असे स्तंभ जर खोट्या बातम्या देऊन इतरांना स्तंभित करत असतील तर हाताची घडी तोंडावर बोट ठेवत गप्प बसून राहायचं का? हे काही न्यूजवाले बुद्धीला गंज लागला म्हणून की काय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा फोटो देऊन त्यावर माहिती मात्र मुकपट चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्री सुलोचना, ज्या रुबी मायरस या नावाने ओळखल्या जात होत्या,ज्यांना १९७३ साली दादासाहेब फाळके या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांची माहिती माहिती देण्याचं धाडस कसं करू शकतात. मराठी हिंदी सिनेमांमध्ये नायिका ते चरित्र अभिनेत्री अश्या भूमिका साकारणाऱ्या सुलोचना दीदी जनतेला, सिने रसिकांना अजूनही माहीत आहे. मग तरीही ब्रेकिंग न्यूज, सणसणीत काहीतरी देण्याच्या चढाओढीत असणारे हे काही पत्रकार गांजा ओढून की दारू ढोसून छाती ठोकपणे अश्या बातम्या देतात?..” महेश टिळेकर.