मित्रहो, अलीकडच्या काळात वैविध्यपूर्ण चित्रपटांमुळे सिनेसृष्टीला आणि कलाकारांना सुगीचे दिवस आले आहेत, सुपरहिट झालेले चित्रपट हजारो कोटींचा टप्पा पार करत आहेत. आजही अशा गाजलेल्या चित्रपटांची चर्चा युवकांमध्ये रंगत असते. मराठी चित्रपट सृष्टीत देखील खूपसे चित्रपट प्रसिद्ध झाले आहे पण मागील काही वर्षात सर्वात जास्त प्रसिद्ध झालेला चित्रपट म्हणजे “सैराट”. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली होती. खेडवळ भाषा, पक्की मैत्री, निस्वार्थ प्रेम अतूट विश्वास यासारख्या अनेक गोष्टी यातून शिकायला मिळतात.
नागराज मंजुळे यांचे अप्रतिम दिग्दर्शन आणि सर्वच्या सर्व नवीन चेहरे असलेल्या चित्रपटातील कलाकारांच्या नैसर्गिक अभिनयामुळे चित्रपटाल प्रेक्षांच्या प्रसिद्धीस पात्र ठरला. सैराट मधील गाणी देखील खूप हटके होती आणि गाजली देखील. सैराटचे वेड भन्नाट होते यातील प्रत्येक डायलॉग प्रसिद्ध आहे, खूप साऱ्या गोष्टी रसिक प्रेक्षक आठवणीत ठेवून आहेत. साईटच्या पात्रांविषयी बोलायचे झाले तर सर्वच पात्र खूप वेगळी आणि मजेशीर आहेत, आर्ची आणि परशाची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. त्याचबरोबर परशाचे जिवलग मित्र लंगड्या बाळ्या आणि सल्ल्या यांची जोडी देखील भरपूर गाजली होती. प्रत्येक वेळी त्यांनी केलेला अभिनय पाहून लोक मनसोक्त हसत होते आणि अजूनही त्यातील गमती जमती आठवून रसिकांमध्ये हशा पिकतो. चित्रपटात ज्या सीन मध्ये लंगड्या आणि परशा आहेत तो प्रत्येक सीन विनोदांनी भरभरून आहे. मग तो सीन गॅरेजमध्ये असो किंवा विहिरीजवळचा किंवा मग शेतातील असो. झिंगाट गाण्यात ही ती दोघे खूप छान नाचताना पहायला मिळाले.
सैराट चित्रपटातील लंगड्या आणि सल्ल्या हे कलाकार आहेत तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख, या दोघांसाठी त्यांचा हा पहिला चित्रपटच जॅकपॉट ठरला. सैराटच्या भरघोस यशानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीस येत आहेत. सुनील मगरे यांनी दिगदर्शित केलेला “फ्रि हिट दणका” हा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून यामध्ये आपणास तानाजी आणि आरबाझ यांची जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा खूप रंजक आहे, यामध्ये जिवापाड दोस्ती करणाऱ्या मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे, मित्रांचा एक मोठा ग्रूप दाखविण्यात आला आहे जो त्यांच्यातील मैत्रीमुळे कशा प्रकारे येणाऱ्या संकटांना सामोरे जातात हे दाखविले आहे. या फिल्मच्या पोस्टर वरून अंदाज लावला जाऊ शकतो की मूळ कथानक प्रेमकथेशी जोडलेले आहे त्यामुळे हा चित्रपट खूपच रंजक असेल यात शंका वाटत नाही. हा चित्रपट सैराट सारखाच मजेशीर आणि हृदयाला भिडणारा असेल अशी आशा बाळगूया.. चित्रपटातील कास्ट बहुतेक तरुण मंडळीच आहेत जी उत्कृष्ट कलाकृती सादर करून त्यांच्या भूमिकांना पुरेपूर न्याय देतील..
फ्रि हिट दणका या चित्रपटाची निर्मिती उमेश नर्के, धर्मेंद्रसिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव हे करत आहेत. यंटम चित्रपटकची अभिनेत्री अपूर्वा आणि फॅन्ड्री चित्रपटातील जब्या सोमनाथ यांच्या प्रीतीचा रंग कशा प्रकारे रसिकांना भुरळ घालतो हे पाहण्यासाठी रसिकजण उत्सुक आहेत. तानाजी आणि अरबाज यांची त्या दोघांना दिलेली साथ आणि सोबतीला तुफान कॉमेडी देखील चित्रपटात दिसेल त्यामुळे या आगामी चित्रपटाची आतुरता सर्वांनाच आहे. जसराज जोशी आणि स्वामी शैलेश यांच्या आवाजात रंग प्रीतीचा बावरा हे गाणे स्वरबद्ध केले गेले जे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. चित्रपटाचे बरेचशे शूटिंग नगर जिल्ह्यामधील पारनेर, माणगंगा भागात करण्यात आले आहे.
मित्रहो हा चित्रपट चित्रपटगृहात नक्कीच पहा, तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या मित्र मंडळींना वाचण्यासाठी शेअर करायला विसरू नका.