मित्रहो कधी फक्त कल्पना केल्या जाणाऱ्या घटना आज सत्य बनून माणसाला विळखा घालत आहेत. नाही म्हणता सगळेच सुरळीत चालू आहे पण नीट पाहिले तर गरीब उपासमारीने मरतोय त्यात महामारीची भीती आहेच, तीच भीती श्रीमंतांच्या घरात घटना बनून उतरत आहे त्यामुळे श्रीमंत आपला पैसा जीव वाचवण्यासाठी देत आहे, पण पैसा काय कोणीही देईल ओ! रुग्ण बनून पलंगावर तालमळणाऱ्या जीवाचं काय होत असेल याची जाणीव फक्त त्यालाच असू शकते. पोलीस, डॉक्टर यांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे, कुटुंब सोडून कोरोनाशी झुंज देण्यात रुग्णाला साथ देत आहेत. खरेतर या परिस्थितीमुळे जगण्याचे मूल्य कळले आहे, माणूस यशाच्या दारात उभा असताना त्याला पाठीमागे खेचणारे भरपूर जण होते पण आता तो मरणाच्या दारात उभा आहे तर कोणीच पाठीमागे खेचणारे नाही. पण जरी ही लढाई त्याची एकट्याची असली तरीही आता त्याच्या सोबत अनेक लोक उभे राहिले आहेत.
बॉलिवूड मधील अनेक कलाकारांनी देशाच्या या पडत्या काळात खूपशी आर्थिक मदत केली आहे, तसेच देशातील काही नामवंत उद्योगपतींनी देखील देशाला खूप मदत केली आहे. हे जरी असले तरीही आता आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील तारका देखील मदतीसाठी सरसावले आहेत. मग ती अश्विनी महंगडे असो अथवा आपला सिद्धेश प्रभाकर लिंगायत असो. मित्रहो आज आपण सिद्धेशची चर्चा रंगवणार आहोत. सिद्धेश हा एक रंजक व्यक्ती आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटातून रसिकांना आपला हसरा चेहरा दाखवला आहे. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र तो एक जबाबदार नागरिकाची भूमिका देखील खूप छान निभावली आहे.
या लोकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रेटींची लग्न उरकली आहेत, अनेकांची ठरली आहेत. कोणाचा साखरपुडा झाला, कोणाचा प्रेमविवाह झाला तर कोणाचा घरच्यांनी ठरवलं, तर कोणाला मूल झाले यातील हा तारा सिद्धेश याचे देखील एका सुंदर मुलीशी लग्न ठरले आहे. पण असे असतानाही ठरलेलं लग्न रद्द करून तो आपल्या होणाऱ्या पत्नीसह रुग्णांची सेवा करत आहे. पती पत्नीचा खरा अर्थ त्या दोघांनी दाखवून दिला आहे. लग्न जरी नंतर करणार असले तरीही त्या लग्नातील वचने मात्र ते दोघे ही निभावत आहेत. येणाऱ्या प्रत्येक वळणावर निस्वार्थपणे एकमेकांचा हाथ धरून वाटचाल करत आहेत. प्रत्येक मुलीची इच्छा असते की एखाद्या छानशा मुलाशी आपले लग्न व्हावे आणि सुखात संसार व्हावा पण सिद्धेशची होणारी पत्नी म्हणजेच महेश्वरी हिने कसलीच तक्रार न करता सिद्धेशच्या या कार्यात सहभागी झाली आहे आणि दिवसरात्र त्याच्या सोबत राहून रुग्णांची सेवा करत आहे. खरंच तीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. महेश्वरीने आपल्या होणाऱ्या पतीला निस्वार्थपणे या कार्यात साथ देऊन तरुण पिढीतील मुलींना एक आदर्श दिला आहे. हे दोघेही कोणताच गाजावाजा न करता अगदी शांतपणे सेवा करत आहेत.
सिद्धेश हा एक उत्कृष्ट कलाकार आहे, त्याने आजवर “बारायन”,”प्रेमाचा कट्टा”, “टाइम पास २ “, “खारी बिस्कीट” “उनाड” या व अशा अनेक चित्रपटात त्याने आपल्या कलेची जादू दाखवली आहे. तसेच “जागो मोहन प्यारे”,” एक नंबर”, “लक्ष्य”, “प्रीती परी तुझंवरी”, “गाव गाथा गझाली” यासारख्या मालिकेमध्ये ही तो झळकला आहे. गेले आठ वर्षे त्याने आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात एक विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याने आपली कला रसिकांना इतक्या छान पध्दतीने दाखवली आहे की रसिक त्याचे चाहते बनले आहेत. त्याच्या चाहत्यांची यादी सुध्दा खूप मोठी आहे आणि आता तर त्याच्या या कार्यामुळे अनेक जण त्याला आशीर्वाद देत आहेत. सिद्धेश आणि त्याची होणारी पत्नी महेश्वरी यांनी कौतुकास्पद काम केले आहे आणि अजूनही करत आहे.
रुग्णांची निस्वार्थ सेवा करत असल्याबद्दल kalakar.info च्या टीम कडून त्या दोघांचेही खूप आभार. त्यांनी स्वतःची स्वप्ने बाजूला सारून समाजाला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला हे काम मराठी चित्रपट सृष्टीची मान अभिमानाने उंचावणारी आहे. त्या दोघांच्याही कार्याला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी अशीच साथ आयुष्यभर एकमेकाला द्यावी हीच सदिच्छा.