प्राजक्ता माळीने नुकतीच दिलेली एक मुलाखत चर्चेत आहे. या मुलाखतीत तिने ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. तर यावरून तिने मिडियाचेही कान पिळले आहेत. राजकारणातील प्रवेशाबद्दलही प्राजक्ताने या मुलाखतीत खुलासा केला आहे. त्यामुळे तिची ही मुलाखत चांगलीच व्हायरल होत आहे. नुकताच प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर २.१ मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. रानबाजार चित्रपटासाठी वजन वाढवल्यामुळे आणि बोल्ड सीन्समुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. तेव्हा ती या ट्रोलर्सचे कमेंट सेक्शनच बंद करून ठेवते.
याबद्दल म्हणते की, मला कुठे ट्रोल केलं जाणार हे माहीत होतं. जेव्हा मी रानबाजार चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला होता तेव्हा मी त्याचे कमेंट सेक्शनच बंद करून ठेवले होते. पाच निगेटिव्ह कमेंट्स असल्या की प्राजक्ता माळी आपल्याला उत्तर देईल ही एक ट्रोलर्सची मानसिकता तयार झालेली असते. पण मी ह्यांना का उत्तर देऊ? म्हणून मग मी कमेंट सेक्शन बंद करते किंवा निगेटिव्ह कमेंट्स डिलीट करून टाकते, असे ती म्हणते. राजकारणातील तुझा सगळ्यात आवडता व्यक्ती कोण याबद्दल ती एक व्यक्ती म्हणून कोणाची निवड करता येत नाही. कारण आता लवकरच निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे मी जर त्यांचे कोणाचे नाव घेतले तर लोकं त्या बाजूचा विचार करतील. त्यामुळे मी कोणाचंच नाव खात्रीने इथे घेऊ शकत नाही.
ती पुढे बॉयफ्रेंडचे उदाहरण देते की, “माझ्या हातावर ओशो नावाचा टॅटू आहे. मला एक चान्स होता की हातावर बॉयफ्रेंडचं नाव गोंदवून घेऊ. पण मला खात्री नव्हती की हाच असेल आयुष्यभर म्हणून आणि बघ आता तो नाहीये. मी अस नाव गोंदवायचं ठरवलं होतं की जो माझ्यासोबत लाईफटाइम असेल. मी मरेपर्यंत हे माझ्या हातावर राहणार आहे. जे उत्तर असेल ते बदललं नाही पाहिजे. आणि एवढं मी फार कोणाला ओळखत नाही म्हणून मी ते नाही केलं.” असे ती म्हणते. पण राज ठाकरे हे खूप ब्रिलीयंट माणूस आहे. प्राजक्तराज वेळी मला त्यांना अजून जाणून घेता आलं. त्यांची काही वक्तव्य आहेत जी मी लिहून घ्यायला हवीत असेही ती म्हणते. राजकारणातील प्रवेशाबद्दल प्राजक्ताचे म्हणणे स्पष्ट आहे की, मी सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याच्या विचारात नाहीये.
कारण एक अभिनेत्री म्हणून मी खूप स्ट्रगल केला आहे. आतापर्यंत मी स्ट्रगल करत आली आहे त्याचे यश मला मिळत आहे. एका अभिनेत्री साठी हे यश खूप कमी काळ असते. आणि हेच वय आहे की मी अभिनेत्री म्हणून काम करतीये. हिंदीत सलमान, शाहरुख वयाच्या ५५ व्या वर्षी हिरो म्हणून काम करतात. पण कुठली अशी अभिनेत्री आहे जी वयाच्या ५५ व्या वर्षी नायिका म्हणून काम करते? त्यामुळे हेच वय आहे तुमचं काम करण्याचं आणि मला हे मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. त्यामुळे सध्या तरी मी राजकारणात जाणार नाही असे तिने स्पष्ट केले आहे.