काल बुधवारी ६ डिसेंबर रोजी अभिनेत्री सुरुची अडारकरने अभिनेता पियुष रानडे सोबत मोठ्या थाटात लग्न केले. या लग्नाला मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांचे अभिनंदन केले. सुरुची अडारकर हिचे हे पहिले लग्न होते तर पियुष रानडे याचे ही तिसरे लग्न होते. त्यामुळे त्यांचे लग्न झालेले पाहून अनेक प्रेक्षकांना खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. पियुषने याअगोदर शाल्मली तोळे हिच्यासोबत पहिले लग्न केले होते, पण काही वर्षांतच त्या दोघांनी घटस्फोट घेतला.
त्यानंतर अभिनेत्री मयुरी वाघ हिच्याशी पियुषने दुसरे लग्न केले. पण त्यांचाही संसार अर्ध्यावरच मोडला आणि दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर पियुष सुरुची सोबत तिसऱ्यांदा विवाहबद्ध झाला. या तिघींची ही पहिलीच लग्न होती त्यामुळे अनेजण पियुषला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसत आहेत. तर सुरुचीला देखील अनेकांनी सुखी संसाराचा सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. पण यावर आता प्रथमच सुरुचीने पियुष सोबत लग्न करण्याचे कारण सांगितले आहे. सुरुचीच्या लग्नानंतर तिच्या चाहत्यांना देखील याबाबत प्रश्न पडले होते. यावर उत्तर देताना सुरुची म्हणते की, मी खूप खुश आहे. माझा हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाहीये. हे क्षण माझ्यासाठी एका स्वप्नासारखे आहेत. मी एका चांगल्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे.
तो खूप इमोशनल आणि खूप केअरिंगसुद्धा आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मी पियुष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. असे म्हणत सुरुचीने पियुष सोबत लग्न करण्याचे कारण सांगितले आहे. सुरुची अडारकर ही का रे दुरावा या मालिकेमुळे प्रसिद्धीस आली होती. प्रमुख भूमिका तसेच सहाय्यक भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर पियुष रानडे हा देखील सहाय्यक तसेच विरोधी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या तो काव्यांजली या मालिकेतून विरोधी भूमिकेत पाहायला मिळत आहे. पियुष आणि सुरुची अडारकर हे कधी लग्न करतील यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये. त्याचे हे तिसरे लग्न असल्यानेच हे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.