अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असते त्यामुळे कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायाची सुरुवात करतात किंवा कपड्यांचा ब्रँड सुरू करतात. मराठी इंडस्ट्रीत कलाकारांचे ब्रँड खूपच लोकप्रिय झाले आहेत. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञाचा तेजाज्ञा, निवेदिता सराफ यांचा हंसगामीनी, आरती वाडगबाळकरचा कलरछाप या कपड्यांच्या ब्रँडनंतर आता अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने तिचा ‘we नारी’ या नावाने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. त्यामुळे प्रार्थना बेहेरे आता उद्योजिका म्हणूनही नावारूपाला येत आहे. या नवीन इनिंगला सुरुवात करण्यासाठी तिने घटस्थापनेच्या मुहूर्ताची वाट पाहिली आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रार्थना बेहरे मुंबई सोडून अलिबागच्या फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाली. मुंबईच्या गर्दीला कंटाळून तिने आता अलिबागला कायमस्वरूपी राहण्याचा निर्णय घेतला आहे. पती अभिषेक जावकर सोबत मिळून तिने हा निर्णय घेतला असल्याने प्रार्थना तिच्या या निर्णयावर ठाम राहिली आहे. अलिबागच्या तिच्या या फार्महाऊसची झलक तिने तिच्या युट्युब चॅनलवरून करून दिलेली आहे. काल घटस्थापनेच्या मुहूर्तावर तिने व्यवसायात क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. We नारी या तिच्या साड्यांच्या ब्रँडला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. खरं तर हा साड्यांचा ब्रँड प्रार्थनाची नणंद पल्लवी भिडे हिने खूप आधीच सुरू केला होता. नणंदेच्या ब्रॅण्डसाठी प्रार्थना मॉडेलिंगचे काम करत होती, पण आता ती या ब्रँडची सहभागीदार बनली आहे.
प्रार्थनाची लोकप्रियता खूप मोठी आहे याचाच विचार करून प्रार्थनाने या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रार्थनाने We नारीची भागीदार बनली असल्याचे जाहीर केले आहे. प्रार्थना आणि पल्लवी या ब्रँडचा चेहरा आहेत. नऊ रात्रीचे नऊ रंग असे म्हणत प्रार्थनाने काल पहिल्या दिवशी नारंगी रंगाच्या साड्यांची झलक दाखवली. आज आज नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणत तिने पांढऱ्या रंगाच्या साड्या समोर आणल्या. तिच्या या ब्रॅंडला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पावधीतच तिचा हा साड्यांचा ब्रँड नावारूपाला येईल अशी तिला आशा आहे. त्यासाठी सेलिब्रिटींकडून प्रार्थनाला शुभेच्छा देखील मिळत आहेत.