स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रिऍलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा निकाल नुकताच हाती आला. काल शोच्या महाअंतिम सोहळ्यात मोठमोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावून स्पर्धकांसोबत गाणी म्हटली. उर्मिला धनगर आणि संकल्प काळेच्या अंबाबाई गोंधळाला ये गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. या शोमध्ये अंतिम फेरीत श्रुती भांडे आणि संकल्प काळे यांच्यात चुरशीची लढत रंगली. यावेळी संकल्पने विजेते पदावर शिक्कामोर्तब केलेला पाहायला मिळाला. संकल्प काळेला विजेतेपदाच्या ट्रॉफीसोबत ४ लाखांचा धनादेश मिळाला.
संकल्प हा जालन्याचा. याअगोदर त्याने विविध शोमध्ये सहभाग दर्शवला होता. पण मी होणार सुपरस्टारच्या मंचाने त्याला संधी मिळवून दिली आणि या शोचा तो विजेता देखील ठरला. आदर्श शिंदे सारखे गुरू त्याला लाभले हे तो त्याचे भाग्यच समजतो आणि म्हणूनच विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर तो आपल्या गुरूंचे आभार मानतो. तर श्रुती भांडे हिने उपविजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. श्रुतीला २ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सृष्टी पगारे हिने परिक्षकांची मनं जिंकत तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावलेले पाहायला मिळाले. श्रुष्टी सोबत जुईली जोगळेकर हिने गाण्याचे सादरीकरण केले होते. तर श्रेया गाढवे, रागिणी शिंदे, काव्य भोईर यांचे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कौतुक करण्यात आले.
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद शोच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला होता. त्याचमुळे या शोचे दुसरे पर्व देखील हिट होणार याची खात्री होती. सृष्टी पगारे आणि श्रुती भांडे या बालगायकांनी याअगोदर देखील गाण्यांच्या रिऍलिटी शोमध्ये सहभाग दर्शविला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा चांगला फॅन फॉलोअर्स होता. परीक्षक सचिन पिळगावर, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. स्पर्धकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत या सर्वांनी त्यांचे कौतुकही केले ते वेळप्रसंगी कानउघडणी देखील केली. अशातच आता मी होणार सुपरस्टार या शोची महाअंतिम सोहळ्याने सांगता झाली.