मराठी चित्रपट चांगले बनत नाहीत अशी ओरड प्रेक्षकांची असते त्यामुळे मराठी चित्रपटांऐवजी लोक हिंदी आणि टॉलिवूडच्या चित्रपटांना गर्दी करत असतात. असे एक सर्वसाधारण मत देणारे प्रेक्षक आता चित्रपट चांगला असूनही केवळ पाचच जण त्याला हजेरी लावत असतील तर याचे कारण शोधणे गरजेचे आहे. अनेकदा मराठी चित्रपटांना स्क्रीन दिल्या जात नाहीत तेव्हा मनसे सैनिक या मराठी चित्रपटांच्या मदतीला धावून जात असतात. पण आता स्वतः अमेय खोपकर यांनाच हा अनुभव आलेला आहे. काल ६ ऑक्टोबर रोजी आत्मपॅम्प्लेट हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
पण अख्ख्या थिएटरमध्ये केवळ पाचच जण असल्याने मराठी दर्दी रसिक गेले कुठे? असा प्रश्न अमेय खोपकर यांना पडला आहे. परेश मोकाशी सारखा उत्तम लेखक जेव्हा अशा सामाजिक चित्रपटांचे लिखाण करतो आणि आशिष बेंडे सारखा दिग्दर्शक त्याला लाभतो तेव्हा आत्मपॅम्प्लेट सारखा चित्रपट तयार होतो. हा चित्रपट तुम्हाला हसून लोटपोट तर करतोच पण यातून तुम्हाला एक सामाजिक संदेशही दिला जातो. तेव्हा असे चित्रपट पाहण्यासाठी नक्कीच गर्दी करावी असे मत अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं आहे. हा चित्रपट पाहून आल्यानंतर हेमंत ढोमे, हेमांगी कवी, गिरीजा ओक, नीना कुळकर्णी यांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत थिएटरमध्ये एका जागेवर खिळवून ठेवतो यातच या चित्रपटाचे खरे यश दडलेले आहे.
पण असे चित्रपट पाहायला प्रेक्षकच नाहीत अशी परिस्थिती समोर दिसत आहे. मुळात आत्मपॅम्प्लेट या नावाचा चित्रपट आहे हेच प्रेक्षकांना माहीत नाहीये. त्यामुळे चित्रपट कधी रिलीज झाला हेही प्रेक्षकांना ठाऊक नाहीये. खरं तर बॉलिवूड, टॉलिवूडच्या चित्रपटांचे प्रमोशन दणक्यात होत असते त्यासाठी खूप खर्च करण्यात येतो. पण सर्वसामान्यांचा चित्रपट प्रमोशनच्या कारणास्तव मागे पडतो. आत्मपॅम्प्लेट या नावाचा चित्रपट बनतोय याची कल्पना प्रेक्षकांनाही नव्हती. त्याचमुळे चित्रपटाचे कथानक चांगले असूनही असे चित्रपट पाहण्यासाठी खूप कमी येतात. निर्मात्यांनी अशा गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा गोष्टींना प्रसिद्धी दिली जाते मात्र अशा गोष्टी व्हायरल होत नाहीत.
किंवा त्या गोष्टींवर चर्चा केली जात नाही म्हणूनच अशा चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळत नाही. शाळेत असताना आपण जे अनुभव घेतले आहेत तेच मुद्दे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक विनोदी, सामाजिक संदेश देणारा कौटुंबिक चित्रपट पाहण्याची ईच्छा असेल त्याने हा चित्रपट आवर्जून पाहावा, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांची निराशा नक्कीच होणार नाही हे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच ते जाणवेल. पण त्यासाठी तुम्ही अशा चित्रपटांना प्रतिसाद देणे आवश्यक आहे.
मानसिकता तयार मराठी लोंकाचीझाली बाँलीवुड टाँलीवाडुमधले तिआश्लीलता.भव्यदिव्य ड्रामाच्या नावाखाली घतलेला धागडधींगा पाहण्याची
याच कारण बहुदा जितक्या प्रमाणात त्या चित्रपटाची जाहिरात व्हायला हवी तितकी ती होत नसावी. पदार्थाची चव खाल्ल्यावर समजते पण त्याची तितक्या प्रभावीपणा पब्लिसिटी आणि सजावट असेल तर तो चाचण्याची उत्सुकता जागरूत होते.
निरनिराळ्या क्लुप्त्या लढवून प्रेक्षकांच्या पाहिल्या फळीला चित्रपट गृहात जायला भाग पडल की तो चित्रपट छान असेल तर पुढील माऊथ पब्लिसिटीच काम बिन खर्चाने प्रेक्षकच करतात.
मराठी चित्रपट पाहायला अमराठी प्रेक्षकांनी गर्दी केल्याचीही खूप उदाहरण आपल्याकडे आहेत.
तेव्हा चित्रपट बनविण्यासाठी जितके परिश्रम घेतले जातात तितकेच श्रम तो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी घेणे गरजेचे आहे जेणेकरून मराठीच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनाही पाहावासा वाटला पाहिजे.