स्टार प्रवाह या वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत नुकताच एक ट्विस्ट आणण्यात आला आहे. मोनिकाचा मित्र शुभंकर ठाकूर याची या मालिकेत एन्ट्री झालेली आहे. ही भूमिका अभिनेता हार्दिक जोशी याने साकारली आहे. शुभंकर ठाकूर हा मोनिकाच्या जवळचा असला तरी तोच पिहुचा बाप आहे का याचा मालिकेत लवकरच उलगडा होईल. शुभंकरच्या येण्याने मोनिकाचाही भूतकाळ उलगडणार असेच चित्र आता समोर आले आहे. मोनिका ह्या गोष्टी मल्हारपासुन लपवून ठेवून होती. पण मंजुळाला तिचं हे गुपीत ठाऊक असते.
त्याचमुळे मोनिका मंजुळा सांगेल तसे ऐकत होती. पण आता स्वराच्या मदतीने मोनिकाने तिचा हा पुरावा गायब केला आहे. पिहू ही मल्हारची मुलगी नसून ती शुभंकरची मुलगी आहे का हे लवकरच मालिकेतून उलगडणार आहे. हार्दिक जोशीला ही मालिका मिळाली. त्यावेळी अक्षया देवधर त्याच्यासाठी खूपच उत्सुक होती. अक्षया सध्या कुठलाही प्रोजेक्ट करत नाहीये पण ती आता मालिका पाहण्यात वेळ घालवत आहे. त्यामुळे ती अभिनेत्री असण्यासोबतच आता प्रेक्षकाचीही भूमिका साकारत आहे. अक्षयाला मी जेव्हा सांगितलं की मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करतोय तेव्हा तिने लगेचच होकार दे असे सांगितले होते. या मालिकेत अभि म्हणजेच अभिजित खांडकेकर सुद्धा आहे असे ती म्हणाली.
तू लगेच ही मालिका कर अशी तिची पहिली प्रतिक्रिया होती. मलाही मालिका करायला जास्त आवडतात. मला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रातून वर आलोय त्या क्षेत्रात आपल्याला काम करायला हवं. त्यामुळे मालिकेतून मी करत राहणार आहे. हार्दिक सध्या महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटात काम करत आहे. चित्रपटाचे शूटिंग गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होते मात्र आता हार्दीकचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्यासाठी तो सज्ज झाला आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत त्याने एन्ट्री केली असून त्याच्या येण्याने मालिकेला एक वळण मिळाले आहे. आता हार्दिक सकारात्मक भूमिका साकारतोय की तो मल्हारच्या विरोधात असणार ये येत्या काही भागातच स्पष्ट होईल.