Breaking News
Home / मराठी तडका / अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन.. अंत्यसंस्कारावेळी अंकिताला अश्रू अनावर
ankita lokhande father
ankita lokhande father

अंकिता लोखंडेच्या वडिलांचे निधन.. अंत्यसंस्कारावेळी अंकिताला अश्रू अनावर

हिंदी चित्रपट मालिका अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे वडील शशिकांत लोखंडे यांचे दुःखद निधन झाले आहे. काल शनिवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशिकांत लोखंडे हे ६८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण माध्यमांमधून असा दावा कर​ण्यात आला आहे की त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती. ते काही दिवसांपासून आरोग्याच्या कारणास्तव त्रस्त होते.अंकिता आणि विकी जैन यांनी वडिलांच्या मृत्यूबद्दल अधिकृत माहिती देण्याचे टाळले आहे.

ankita grandmother and family
ankita grandmother and family

ही बातमी समजताच हिंदी मालिका सृष्टीतील कलाकारांनी दुःखद भावना व्यक्त करत अंकिता आणि तिचा नवरा विकी जैन यांना दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी भावना व्यक्त केली आहे. कुठलीही मुलगी आईपेक्षा वडिलांच्या खूप जवळची मानली जाते, अंकिता देखील तिच्या वडिलांच्या आणि खासकरून आजीच्या खूप जवळ होती. यावर्षी फादर्स डेच्या निमित्ताने तीने त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली होती. माझ्या पहिल्या नायकाला, माझ्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा. मला तुमच्याबद्दल काय वाटते त्याबद्दल मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही पण आय लव यू. मी लहानपणी तुम्हाला बर्‍याच गोष्टींशी संकटांशी लढताना पाहिले आहे. पण तुमच्या मुलांच्या बाबतीत तसे होणार नाही याची काळजी तूम्ही नेहमीच घेतली आहे.

actress ankita lokhande
actress ankita lokhande

मला माझ्या पंखांनी उडायला लावले आणि मला जे व्हायचे आहे ते करायला शिकवले. मी जे आहे ते तुमच्याचमुळे आहे, हे सर्व तुमच्या समर्थनामुळे आणि तुमच्या शक्तीमुळे बनले आहे. या भावनेसह अंकिताने तिच्या वडिलांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देणारा व्हिडिओही शेअर केला होता. मात्र काल अचानक प्रकृती खालावल्याने अंकिताच्या वडिलांचे निधन झाले. आज वडिलांच्या पार्थिवाला अंकिताने खांदा दिला होता. वडिलांना अखेरचा निरोप देताना अंकिता खूप भावुक झाली होती. मुंबईच्या ओशिवाडा येथील स्मशानभूमीत तिच्या वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विकी जैन आणि अंकिताला त्यांच्या अश्रू लपवता आले नाही.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.