Breaking News
Home / मराठी तडका / जुई गडकरी नंतर आता मराठी सृष्टीतील या कलाकारांकडून इर्शाळवाडीला पोहोचणार मदत
onkar bhojane ashok saraf
onkar bhojane ashok saraf

जुई गडकरी नंतर आता मराठी सृष्टीतील या कलाकारांकडून इर्शाळवाडीला पोहोचणार मदत

१९ जुलैची रात्र इर्शाळवाडीसाठी काळरात्र बनून आली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाडीवर मोठी दरड कोसळली आणि अख्खी वाडी दरडीखाली नष्ट झाली. यातून अनेकजणांना वाचवण्यात आले तर अनेकजण दगावले. दुर्गमता, सततचा पाऊस, उंच डोंगराची चढण आणि दाट धुके अशा परिस्थितीत सुद्धा इर्शाळवाडीच्या लोकांना वाचवण्याचे काम प्रशासनाकडून केले गेले. मात्र तीन दिवसांनंतर परिसरात दुर्गंधी पसरू लागली तेव्हा शोधमोहीम थांबवण्यात आली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना मृत घोषित करण्यात आले. तेव्हा सर्वच स्तरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.

karun gela gaon vaccum cleaner natak
karun gela gaon vaccum cleaner natak

इर्शाळवाडीच्या मदतीसाठी राज्यशासनाने पुढाकार घेतला असून येत्या महिन्याभरात सिडको मार्फत गावाच्या पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे. यासोबतच काही खाजगी संस्थांनीही मदत पुरवली आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळली ही बातमी कळताच मराठी सृष्टीतील अभिनेत्री जुई गडकरी हिने मोठी हळहळ व्यक्त केली होती. त्यानंतर या लोकांसाठी तिने अन्न, चादरी, चपला, औषधं अशा प्राथमिक स्वरूपाची मदत पाठवली. आपल्या चाहत्यांनाही तिने मदतीचे आवाहन केले. जुई गडकरी पाठोपाठ आता मराठी सृष्टीतून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी नाट्यसृष्टी पुढे सरसावली आहे. अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या व्हॅक्यूम क्लिनर या नाटकाच्या प्रयोगातून मिळणारी रक्कम इर्शाळवाडीच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

ashok saraf onkar bhojane
ashok saraf onkar bhojane

येत्या ५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाट्य संकुल येथे ह्या नाटकाचा प्रयोग पार पडणार आहे. नाट्य निर्माते दिलीप जाधव हे प्रयोगातून मिळालेली रक्कम इर्शाळवाडीला देणार आहेत. याचसोबत भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांची भूमिका असलेला करून गेलो गाव या नाटकाच्या प्रयोगातून मिळालेली रक्कम इर्शाळवाडीच्या मदतीसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी करून गेलो गाव या नाटकाचे तीन प्रयोग आयोजित केले आहेत. त्यातील एका प्रयोगातून मिळालेली रक्कम मदत म्हणून देण्यात येईल असे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले आहे. हा मदतीचा ओघ पाहून आणखी काही नाट्य तसेच सिनेमा निर्मात्यांनी दुर्घटनाग्रस्तांना मदत पाठवण्याचे ठरवले आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.