Breaking News
Home / मराठी तडका / तोंडातील सिगरेट पाहून रितेश च्या मुलांनी विचारला प्रश्न.. रितेशने दिलं खास उत्तर
riteish deshmukh ved success
riteish deshmukh ved success

तोंडातील सिगरेट पाहून रितेश च्या मुलांनी विचारला प्रश्न.. रितेशने दिलं खास उत्तर

​जेनेलिया आणि रितेश देशमुख यांचा प्रमुख भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. वेड चित्रपट जरी रिमेक असला तरी रितेशचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यामुळे चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकां​​नी हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जरूर जा अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे. महत्वाचं म्हणजे वेड चित्रपटात कुठलाही खलनायक तुम्हाला दिसणार नाही. अगदी हलकी फुलकी कॉमेडी, प्रेयसीच्या विरहात बुडालेला सत्या. मात्र सत्याच्या एकतर्फी प्रेमात असलेली श्रावणी चित्रपटाच्या अखेरीस सर्वांना भावुक करून जाते.

riteish deshmukh ved success
riteish deshmukh ved success

सत्या आणि श्रावणीचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ कोटी ३० लाखांचा गल्ला जमवला. शनिवारी ३.२५ कोटी, रविवारी मात्र हा आकडा अधिक वाढत जाऊन ४.५० कोटींचा पल्ला गाठलेला पाहायला मिळाला. अवघ्या चार दिवसात चित्रपटाने जवळपास १३ कोटींचा टप्पा पार केलेला दिसून येत आहे. वेड चित्रपटाच्या यशाची घोडदौड ह्या आठवड्यात देखील अशीच चालू राहणार आहे. मात्र सध्या चित्रपटातील एका सिनमुळे रितेशला त्याच्या मुलांनी एक प्रश्न विचारला होता. हा प्रश्न म्हणजेच तुमच्या तोंडात ते काय आहे? रितेशने वेड चित्रपटासाठी तोंडात सिगरेट घेतलेली पाहून मुलांनी हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारला.

riyan and rahil deshmukh
riyan and rahil deshmukh

रितेशने त्यांना सरळ जे आहे तेच खरे उत्तर दिले. प्रश्नावर उत्तर देताना रितेश म्हणतो की, माझ्या मुलांनी माझ्या तोंडात काय आहे ते विचारलं. ते म्हणाले की आम्ही इतर लोकांच्या तोंडात सुद्धा हे पाहिलं आहे. मी त्यांना सांगितलं की सिगरेट ही आरोग्यासाठी धोकादायक आहे. मी ही गोष्ट कधी करत नाही. आम्ही दोघे पण सिगरेट आणि दारू पित नाहीत, हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं. रितेश आपल्या मुलांच्या खूप क्लोज आहे. सेलिब्रिटी असला तरी कोणत्या गोष्टी वाईट कोणत्या गोष्टी चांगल्या याचे ज्ञान तो आपल्या मुलांना देत असतो. जेनेलियाचे देखील या गोष्टीकडे बारकाईने लक्ष्य असते. मोठे होऊन आपल्या मुलांनी कुठले क्षेत्र निवडावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असला तरी संस्कारांची शिदोरी असली की यशाचा मार्ग निश्चित मिळतो.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.