Breaking News
Home / जरा हटके / दाक्षिणात्य सुपरस्टारच्या लग्नाला अल्लू अर्जुनसह या सेलिब्रिटींची हजेरी.. इटलीमध्ये सजला राजेशाही थाट
varun tej wedding
varun tej wedding

दाक्षिणात्य सुपरस्टारच्या लग्नाला अल्लू अर्जुनसह या सेलिब्रिटींची हजेरी.. इटलीमध्ये सजला राजेशाही थाट

सेलिब्रिटींचे लग्न म्हटलं की त्या लग्नाचा थाट राजेशाही असणार हे वेगळे सांगायला नको. टॉलीवूड सुपरस्टार वरुण तेज याचा आज १ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडत आहे. वरूण तेज आज त्याची गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठी सोबत लग्नबंधनात अडकणार आहे. फक्त जवळच्याच मित्र मंडळींना आणि कुटुंबातील जवळच्या नातेवाईकांनाच त्यांनी या लग्नाला खास आमंत्रण दिले आहे. इटलीतील टस्कनी या रोमँटिक शहरात वरुण आणि लावण्याचा डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन आखला आहे. ज्या ठिकाणी हे लग्न होणार आहे तिथे पाहुण्यांना राहण्यासाठी ३१ रूम्समध्ये खास सोय करण्यात आली आहे.

varun tej family
varun tej family

लग्नानंतर जवळच असलेल्या एका चर्चमध्ये रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून वरुण आणि लावण्याच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींना सुरुवात झालेली आहे. ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या जवळच्या  मित्रांसाठी त्यांनी लग्नाआधीची कॉकटेल पार्टी आयोजित केली होती. त्यानंतर मेहेंदीचा सोहळा पार पडला. यावेळी सुपरस्टार निथिन त्याच्या पत्नीसह हजेरी लावताना दिसला. तर अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीनेही हातावर मेहेंदी सजवून घेतली. काल ३१ ऑक्टोबरला त्यांच्या हळदीचा सोहळा पारंपारिक तेलुगू पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी टॉलिवूड सुपरस्टार चिरंजीवी पत्नीसह उपस्थित होते. तर आज १ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४८ वाजता होणाऱ्या लग्न सोहळ्यात अल्लू अर्जुनची खास उपस्थिती असणार आहे.

varun tej wedding ceremony
varun tej wedding ceremony

वरुण आणि लावण्या यांच्यासह त्यांचे कुटुंबीय २७ ऑक्टोबर रोजीच इटलीला रवाना झाले होते. हैद्राबाद येथे विमानतळावर त्यांना मीडियाने स्पॉट केले होते. वरुण आणि लावण्याच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी टॉलिवूड सेलिब्रिटी देखील अगोदरच इटलीमध्ये दाखल झाली आहेत. अल्लू अर्जुन त्याच्या पत्नी आणि मुलांसोबत तिथे हे डेस्टिनेशन वेडिंग अटेंड करायला गेला आहे त्यासोबतच तो तिथल्या शहरात फिरण्याचाही आंनद लुटताना दिसत आहे. अल्लू अर्जुन त्याच्या मुलासह ब्लॅक सुटमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसला. लग्न सोहळ्यात तो सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसला. वरुण आणि लावण्या दोघेही सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे त्यांचे हे राजेशाही थाटातले लग्न कसे पार पडते याची त्यांच्या चाहत्यांमध्ये जास्त उत्सुकता आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.