Breaking News
Home / जरा हटके / बाबासाहेब तुम्ही म्हणालात शिका.. शिंदे शाही कुटुंबाचे व्यवसायात पदार्पण
adarsh anand shinde
adarsh anand shinde

बाबासाहेब तुम्ही म्हणालात शिका.. शिंदे शाही कुटुंबाचे व्यवसायात पदार्पण

केवळ कला क्षेत्रावर अवलंबून न राहता कलाकारांनी अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करायला हवा असे म्हटले जाते. यातुनच अनेक कलाकार कपड्यांचा किंवा हॉटेलच्या व्यवसायाकडे वळलेली पाहायला मिळतात. अशातच ज्यांच्या चार पिढ्या गायन क्षेत्रात कार्यरत आहेत त्या शिंदे शाही कुटुंबाने देखील आता व्यवसायाचा मार्ग निवडला आहे. शिंदे कुटुंबीय हे गेल्या चार पिढ्यांपासून गायन क्षेत्रात नाव लौकिक करत आहे. पण आता या कुटुंबाने स्वतःचा व्यवसाय असावा या हेतूने पंढरपूर येथे पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

utkarsh shinde petolpump
utkarsh shinde petolpump

गायक आदर्श आनंद शिंदे यांच्या नावाने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. या पेट्रोल पंपच्या उदघाटनावेळी आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे, आदर्श शिंदे, हर्षद शिंदे यांनी हजेरी लावली होती. उत्कर्ष शिंदे यांनी याबद्दल एक सविस्तर पोस्ट लिहताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीचा उल्लेख केला आहे. त्यात उत्कर्ष म्हणतात की, “छत्रपती शिवबा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा,अण्णा भाऊ, ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे”. बाबासाहेब तुम्ही म्हणालात शिका! आम्ही गायक, डॉक्टर, इंजिनिअर झालो. तुम्ही म्हणालात संघटित व्हा! संघर्ष करा, तर आम्ही एक कुटुंब राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पुढे सरसावलो.

utkarsh shindeshahi
utkarsh shindeshahi

रस्त्यावर भजन गाणारी एक पिढी मंदिरात देवाला जागवणारी दुसरी पिढी, लोकसंगीतातून महाराष्ट्राला सन साजरे करताना नाचवणारी तिसरी पिढी ते आज चित्रपटातून सर्वांच्या गळ्याचे ताईत होणारी चौथी पिढी. न थकता न थांबता फक्त कामाला प्रेम करणारे महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन “तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या ब्रीदवाक्याला सैदव मनात कोरून, काम करणारे आमचे शिंदे कुटुंब. भजन, कवाली, गायन, चित्रपट गीते. आता चित्रपटात अभिनेता ते डॉक्टर डिग्री दवाखाने ते आता उद्योग जगात पदार्पण करत शिंदे परिवाराच पाहिलं पेट्रोल पंप वेळापूर, पंढरपुर येथे सुरू झालं. आता विषय पंपावर.

छत्रपती शिवबा, महात्मा जोतीबा, अण्णा भाऊ ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले. म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे. रसिक माय बापाने भर भरून प्रेम दिले त्या प्रेमाची परतफेड आम्हाला कधीच करता येणार नाही. आम्ही हर्षद, आदर्श, उत्कर्ष असेच मेहनत करत राहू पण त्याल साथ हवी तुमच्या आशिर्वादाची. क्यूकी ज़िंदगी कि असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.