Breaking News
Home / मराठी तडका / ही मराठमोळी अभिनेत्री झाली आई… गोंडस बाळाला दिला जन्म
urmila nimbalkar gave birth to beautiful babyurmila nimbalkar gave birth to beautiful baby
urmila nimbalkar gave birth to beautiful baby

ही मराठमोळी अभिनेत्री झाली आई… गोंडस बाळाला दिला जन्म

मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिने एका बाळाला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिला निंबाळकर हिने आपल्या डोहळजेवणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते त्याला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता व तिचे सहकलाकारांकडून अभिनंदन देखील करण्यात आले होते. डोहळजेवणाचा हा सोहळा पुण्यात असलेल्या प्रसिद्ध ‘ ढेपे वाडा’ या ठिकाणी संपन्न झाला होता. ढेपे वाडा हे ठिकाण मराठी सेलिब्रिटिंचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे या वाड्याला सेलिब्रिटी विश्वात खास मानले जाते. अगदी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांसोबत मृण्मयी देशपांडे हीचा विवाह देखील याच वाड्यात संपन्न झाला होता. उर्मिला निंबाळकर हिने देखील आपल्या डोहळजेवणाचा सोहळा इथेच करायचे ठरवले होते. उर्मिला निंबाळकर हिने संगीत सम्राट या रियालिटी शोचे रोहित राऊत सोबत सूत्रसंचालन केले होते. दिया और बाती हम, मेरी आशिकी तुम से ही, एक तारा, दुहेरी अशा मालिका आणि चित्रपटातून अभिनय साकारला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनोलॉजीची पदवी तिने प्राप्त केली आहे.

urmila nimbalkar marathi actress ढेपे वाडा
urmila nimbalkar marathi actress ढेपे वाडा

९ फेब्रुवारी २०१३ रोजी उर्मिलाने सुकीर्त गुमस्ते यांच्यासोबत लग्न केले. उर्मिला नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवरून व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. मधल्या काळात प्रेग्नन्सीचे फोटो सोशल मीडियावर सतत अपलोड करत राहिल्याने तिला ट्रोल केले गेले. विशेष म्हणजे यावर तिने एक पोस्ट लिहून अशा ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिले होते. आपल्या आयुष्यात आलेला हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात टिपून ठेवता यावा एवढीच त्यामागची भावना आहे असे तिने त्या पोस्टमध्ये म्हटले होते. आयुष्यात प्रथमच येणारा हा गोड क्षण आपल्याला अनुभवता यावा त्याचे कौतुक व्हावे अशी तिची त्यामागची भावना होती मात्र महिलांकडून प्रेग्नन्सीबद्दल ट्रोल होत असल्याचे पाहून तिने दिलेले हे उत्तर अनेकांना पटले. तर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली. कलाकारांच्या बाबतीत चांगले वाईट असे बरेचसे अनुभव येत असतात. मात्र आता उर्मिला आई झाल्याचे समजताच तिच्यावर आणि तिच्या बाळावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे यानिमित्ताने तिचे अभिनंदन…

urmila gave birth to baby
urmila gave birth to baby

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.