१९८९ साली “विधिलिखित” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. अनिल तारे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून पद्मनाभ यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळी होती. डॉ श्रीराम लागू, सुहास जोशी, सुधीर दळवी, आशालता, प्रशांत दामले, वत्सला देशमुख, सचिन खेडेकर, अंबर आणि चन्ना रुपारेल या कसलेल्या कलाकारांनी हा चित्रपट अभिनित केला होता. अंबर आणि चन्ना रुपारेल यांचा प्रमुख भूमिका असलेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. या चित्रपटाची नायिका “चन्ना रुपारेल” ही गेल्या अनेक वर्षांपासून चंदेरी दुनियेपासून खूप दूर आहे. विधिलिखित या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता ३२ वर्षे लोटली आहेत या चित्रपटानंतर चन्ना रुपारेल कुठे आता कशा दिसतात याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात. अभिनेत्री चन्ना रुपारेल यांनी विधिलिखित ह्या चित्रपटातून मराठी सृष्टीत पाऊल टाकले होते. मुंबईतील सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या चन्ना रुपारेल याना मराठी, हिंदी भाषा चांगल्या अवगत होत्या. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच नृत्य स्पर्धेतून त्यांनी नेहमी सहभाग दर्शवला होता. विधिलिखित या चित्रपटाअगोदर अनेक हिंदी मालिका त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या होत्या. १९८७ साली चुनौती या हिंदी मालिकेतून त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. महाभारत या लोकप्रिय मालिकेत त्यांनी रुक्मिणीचे पात्र निभावले होते. गेल्या वर्षी रामायण आणि महाभारत या दूरदर्शनवरील मालिका प्रेक्षकांना पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळाल्या होत्या त्यावेळी रुक्मिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री चन्ना रुपारेल यांची आठवण सोशल मीडियाच्या माध्यमातून काढण्यात आली होती. स्वाभिमान या गाजलेल्या हिंदी मालिकेतूनही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.
अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर चन्ना रुपारेल यांनी मॉडेलिंग क्षेत्रात आपले नाव कमावले होते. हिंदी मालिकेतून अभिनयाची संधी मिळू लागल्याने त्यांनी याच क्षेत्रात राहून काम करायचे ठरवले. धार, झी हॉरर शो सारख्या मालिका त्यांनी अभिनित केल्या त्यानंतर मात्र चन्ना रुपारेल झगमगत्या दुनियेपासून दूर राहू ला गल्या. पुढे त्या फारशा कुठल्या मालिकेत दिसल्याही नाहीत. चन्ना रुपारेल सध्या मुंबईतच वास्तव्यास आहेत. त्या सोशल मीडियावर फारशा सक्रिय नसल्या तरी फेसबुक आणि ट्विटर च्या माध्यमातून चाहत्यांशी कधीतरी हितगुज साधताना दिसतात. चन्ना रुपारेल यांच्या बाबत म्हणायला गेले तर एक ९० च्या दशकातील विस्मृतीत गेलेली अभिनेत्री असेच आता म्हणावे लागेल पण तिच्या चाहत्यांच्या ती कायम स्मरणात राहील हे मात्र नक्की…