Breaking News
Home / जरा हटके / स्मिता आजही माझ्या सोबत राहते.. आईच्या आठवणीत प्रतीकची भावनिक पोस्ट

स्मिता आजही माझ्या सोबत राहते.. आईच्या आठवणीत प्रतीकची भावनिक पोस्ट

​​अतिशय प्रतिभावान आणि प्रखर, भावनात्मक अभिनयाच्या वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी भारतीय सिनेजगतातील सौंदर्यवती स्मिता.. स्मिता पाटील शिवाय भारतीय सिनेमाची अर्थपूर्ण मीमांसा शक्य नाही. अवघ्या एका दशकाच्या कारकिर्दीत स्मिताने हिंदी, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्र​​पटांमध्ये कधीही न विसरू शकणाऱ्या अजरामर भूमिका गाजविल्या. मुलगा प्रतीकला जन्म दिल्यानंतर प्रसूतिपश्चात गंभीर आजारामुळे स्मिताने वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता..

talented actress smita patil
talented actress smita patil

आईच्या आठवणींना उजाळा देत प्रतीक खूपच भावुक होऊन म्हणतो, “लहानपणीच माझी आई आम्हाला सोडून गेली, माझ्या मनात आणि हृदयात वर्षानुवर्षे कल्पना करण्याची आणि तिची परिपूर्ण प्रतिमा तयार करण्याचा​​ प्रयत्न केला. आज ​मी तिच्या सोबत एका विशेष ठिकाणी पोहचलो ​आहे, एक विलक्षण मौल्यवान ठिकाण​; आता ती परिपूर्ण आदर्श आई आहे.. एका लहान मुलाचे स्वप्न, जे आपल्या मनात तिची छबी साकारतो आणि त्यासोबतच लहानाचा मोठा होतो. शेवटच्या श्वासापर्यंत त्याला तिची साथ हवी असते, ती आता ६६ वर्षांची आहे.. ती माझी सुपरस्टार, राणी आहे आणि अनंतापर्यंत कायम माझ्यासोबत असणार आहे.” स्मिता पाटील यांचा प्रवास खूपच रोमांचकारी होता, चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटर अभिनेत्री च्या रूपात रुपेरी पडद्यावरील सर्वोत्कृष्ट रंगमंच आणि चित्रपट अभिनेत्री गणल्या गेल्या. स्मिताच्या सुपरहिट चित्रपटांच्या यादीतून एखादा निवडणे अक्षरशः अशक्यप्राय गोष्ट आहे. विविध भाषांतील सुमारे ८० चित्रपटांमधून कारकिर्दीत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार पटकाविला.

beautiful smita patil
beautiful smita patil

वर्ष १९८५ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री प्राप्त करणारी​​ अभिनेत्री ठरली. पुण्यात शिवाजीराव आणि विद्याताई पाटील यांच्या राजकीय सावलीत वाढलेल्या स्मिताने दूरदर्शनवरील वृत्तवाचक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. तिने श्याम बेनेगलच्या चरणदास चोर या चित्रपटातून पदार्पण सिनेसृष्टीत केले. सत्यजित रे, गोविंद निहलानी आणि मृणाल सेन यासह सर्वोत्तम भारतीय दिग्दर्शकांसोबत काम करण्याची तीला संधी मिळाली. मिर्च मसाला, नजराना, सूत्रधार, दहलीज, अनोखा रिश्ता, गुलामी, देबशीषु, शपथ, तरंग, कयामत, हादसा, बाजार, नमक हलाल, सितम, भिगी पलकें, तजुर्बा, मंथन, आक्रोश, चक्र, चिदंबरम मध्ये तिच्या उल्लेखनीय भूमिका होत्या. भूमिका या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात वर्ष २०१२ पासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव साजरा केला जातो. स्मिता पाटील यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार देखील दिला जातो, २०१८ साली हे पुरस्कार अनुक्रमे जैत रे जैत या चित्रपटाला आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना दिले गेले.

evergreen actress smita patil
evergreen actress smita patil

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.