Breaking News
Home / जरा हटके / तेजस्विनी आणि त्रिशूल यांचे जुळतायेत सूर.. मात्र तेजस्विनी घेतीये विचारपूर्वक निर्णय
tejaswini lonari trishul marathe
tejaswini lonari trishul marathe

तेजस्विनी आणि त्रिशूल यांचे जुळतायेत सूर.. मात्र तेजस्विनी घेतीये विचारपूर्वक निर्णय

मराठी बिग बॉसच्या घरात काळ कॅप्टनसीचा टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये रोहित शिंदे बाजी मारताना दिसला. म्हणूनच ह्या आठवड्याचा कॅप्टन बनण्याचा मान रोहितला मिळाला. किमान एक आठवडा तरी रोहित बिग बॉसच्या घरात सेफ झोनमध्ये आलेला दिसत आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक सिजनमध्ये प्रेमाचे वारे वाहताना दिसले आहेत. पहिला सिजन राजेश शृंगारपूरे आणि रेशम टिपणीस यांच्यामुळे गाजला. दुसऱ्या सिजनमध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांचे सूर जुळले. तिसऱ्या सिजनमध्ये विशाल निकम आणि सोनाली पाटील यांचे सूर जुळता जुळता राहिले. मात्र या सर्वांची बाहेर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

tejaswini lonari trishul marathe
tejaswini lonari trishul marathe

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये तर रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे हे दोघेही बिग बॉसच्या घरात रोमँटिक वागतील अशी चर्चा होती. मात्र रुचिरा आणि रोहित दोघेही खूप समंजसपणाने या घरात वावरत आहेत. एकमेकांना सपोर्ट करत प्रोत्साहन देत ते बिग बॉसच्या घरात वेळ घालवत आहेत. मात्र बिग बॉसच्या घरात लवकरच आणखी एक प्रेमकहाणी खुलताना दिसणार आहे. तेजस्विनी लोणारी आणि त्रिशूल मराठे हे दोघेही नाशिकचे आहेत. बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघांनी गावाकडच्या आठवणी शेअर केल्या. त्यानंतर हे दोघे अनेकदा एकमेकांसोबत गप्पा मारताना पाहायला मिळाले.

trishul marathe tejaswini lonari
trishul marathe tejaswini lonari

अमृता धोंगडे हिच्यासोबत गप्पा मारत असताना तेजस्विनीने अजून लग्न का नाही केले? याचा खुलासा केला. तेजस्विनी ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहे. मात्र या सृष्टीत म्हणावा तसा मुलगा तिला भेटला नाही अशी खंत तिने व्यक्त केलेली दिसली. या इंडस्ट्रीत कोणीच हँडसम मुलगा नाही, ज्याच्याशी मी लग्न करावं असे ती या उत्तरात म्हटली. त्रिशूल सोबत मैत्री करताना तेजस्विनी त्रिशूलला एकेरी नावाने कधीही हाक मारत नाही. त्यामुळे त्रिशूलसोबत ती मैत्रीचं नातं बनवताना दिसत आहे. एकीकडे मैत्री करत असताना ती त्रिशूल बद्दलच्या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्रिशूल मुंबईत कधी आला? त्याचं रोजचं शेड्युल काय असतं? त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतं? या सर्व गोष्टी ती हळूहळू गप्पांमधून जाणून घेत आहे.

मात्र कुठेतरी ती या सर्व गप्पांमधून त्रिशूलचं बॅकग्राऊंड चेक करत असल्याची शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. अर्थात त्रिशूलला होकार देण्याआधी किंवा त्याच्या प्रेमात पडण्याआधी त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा. ती एक विचार करत असावी असा तिचा हेतू यातून स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळे तेजस्विनी हे नातं पुढे नेण्याआधी विचारपूर्वक निर्णय घेत असल्याचे दिसून येते. त्रिशूलने अगोदरच महेश माजरेकरांशी बोलताना म्हटले होते की, मी बाहेरही सिंगल होतो आणि आतही सिंगल असणार आहे. मात्र त्रिशूल तेजस्विनीकडे हळूहळू मैत्री वाढवताना दिसत आहे. तेजस्विनी मात्र त्याच्यापासून सिक्युअर राहून विचारपूर्वक निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच या दोघांच्या मैत्रीचं हे नातं एक पाऊल पुढे जाणार की तेजस्विनी मैत्री पर्यंत थांबणार, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.