अभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर अनेक चित्रपट मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. अगंबाई सासूबाई मालिकेत तिने साकारलेले शुभ्राचे पात्र खूपच लोकप्रिय झाले होते. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की एकत्रित काम करत होते त्यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्यावरून त्यांना नेहमीच चाहत्यांकडून लग्न करण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र आमच्यात असं काहीही नाही म्हणून त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.
परंतु गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये “त्यांच्यात काहीतरी नक्कीच आहे आणि ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत” अशा चर्चा जोर धरत असताना याचा खुलासा करावा असे तेजश्रीला वाटले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने आशुतोष सोबतच्या नात्याबाबत खुलासा केला आहे यात ती म्हणते की, आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत आमच्यात मैत्रीपलीकडे काहीही नाही असे सांगून या चर्चेला आता तिने पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आशुतोष पत्की आणि तेजश्री प्रधान हे केवळ चांगले मित्र आहेत हे स्पष्ट झाले आहे. मात्र शशांक केतकरसोबत झालेल्या घटस्फोटानंतर तेजश्री लग्न कधी करणार? असे तिला नेहमीच चाहत्यांकडून विचारले जाते. तेजश्रीने नुकताच एक खुलासा केला आहे की, “मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचं आहे… मला खरंच असा कोणी मुलगा मनापासून आवडल्यास मी त्याच्यासोबत लगेचच लग्न करेन…”
तेजश्रीने नुकताच एक खुलासा केला आहे की, “मला लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायचं आहे… मला खरंच असा कोणी मुलगा मनापासून आवडल्यास मी त्याच्यासोबत लगेचच लग्न करेन… कदाचित पुढच्या ६ महिन्यातच मला माझा योग्य जोडीदार मिळाल्यास मी त्याच्यासोबत लग्न करून माझा संसार थाटेल… फक्त त्याने मला अगोदर प्रपोज केले पाहिजे… तो कला क्षेत्रातला असला तरी काही हरकत नाही… तो मला समजून घेणारा आणि माझ्या करिअरला पाठिंबा देणारा असावा… समजूतदार आणि तितकाच जबाबदार असा जोडीदार मला हवा आहे…” अशा आपल्या भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा अभिनेत्री तेजश्री प्रधानने व्यक्त केल्या आहेत. तेजश्रीने व्यक्त केलेल्या ह्या अपेक्षा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. असा जोडीदार मिळाल्यास ती लवकरच लग्नही करेन असेच तिने आपल्या बोलण्यातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे तेजश्री पुन्हा लग्न करणार का? या प्रश्नाचेही उत्तर आता तिच्या चाहत्यांना मिळाले आहे. येत्या काही दिवसांत तिच्या अपेक्षा पूर्ण करणारा योग्य जोडीदार तिला मिळावा हीच अपेक्षा आता तिचा चाहतावर्ग करताना दिसत आहे…