तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा एक खास फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती बॉयफ्रेंडला प्रेमाची जाहीर कबुली देताना दिसली होती. ही अभिनेत्री कोण असा प्रश्न मीडिया माध्यमातून विचारण्यात आला. पण त्यानंतर ही अभिनेत्री तेजश्री जाधव असल्याचे समोर आले. तेजश्री जाधव ही मराठी चित्रपट तसेच टॉलिवूड चित्रपट अभिनेत्री आहे. बलोच, अकिरा, अट्टी, द फायनल मास्टर स्ट्रोक्स, माधुरी टॉकीज अशा चित्रपटातून तेजश्री मराठीसह तमिळ, बॉलिवूड सृष्टीत झळकली आहे.

मध्यंतरी तेजश्री मराठी बिग बॉसच्या शोमध्ये येणार म्हणून तिच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. स्मिता गोंदकर हिच्यासोबत तेजश्रीने बलोच चित्रपटातून एकत्र काम केले होते. त्यामुळे या दोघींमध्ये एक छान बॉंडिंग तयार झाले आहे. मराठी बिग बॉसच्या रियुनियन पार्टीला स्मिताने तेजश्रीला आमंत्रित केले होते. तेजश्री ही तिच्या हॉट फोटोशूटमुळे चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या तेजश्रीचे २ लाख २० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तीन दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडला प्रेमाची कबुली देणारी एक पोस्ट तिने शेअर केली होती. त्यावेळी पाठमोऱ्या उभ्या असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडला जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण ही उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर तेजश्रीने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव रिव्हील केले.

तेव्हा तेजश्री रोहन सिंग सोबत लग्न करतीये हे उघड झाले. पण यानंतर काल गुरुवारी तेजश्रीने रोहन सिंग सोबत मोठ्या थाटात साखरपुडा करून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रोहन सिंग हा ऑस्ट्रेलियात राहतो. रोहन आणि तेजश्रीची ओळख एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती. यातूनच दोघांमध्ये प्रेम जुळून आले होते. आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वीच रोहनने तेजश्रीला गोव्याच्या किनाऱ्यावर प्रपोज केले होते. त्यावर तेजश्रीने आणि मी उत्तर दिलं हो हो हो ! असे म्हणत रोहनच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला होता. काल गुरुवारी मराठमोळ्या पद्धतीने या दोघांनी साखरपुडा केला आहे. शिव ठाकरे सह नयना मुके या सेलिब्रिटींनी तेजश्रीला साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.