Breaking News
Home / जरा हटके / तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय हे तिला जाणवलं.. सुयश टिळकने प्रथमच सांगितले ब्रेकअपचे कारण
suyash tilak akshaya deodhar
suyash tilak akshaya deodhar

तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय हे तिला जाणवलं.. सुयश टिळकने प्रथमच सांगितले ब्रेकअपचे कारण

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे एकमेकांच्या प्रेमात पडले. रील लाईफ जोडी रिअल लाईफमध्येही विवाहबद्ध व्हावी अशी त्यांच्या चाहत्यांची ईच्छा होती आणि तसे घडले देखील. पण हार्दिक सोबत रिलेशनमध्ये येण्याआधी अक्षया सुयश टिळकला डेट करत होती. मालिकेच्या सेटवर सुयश नेहमीच अक्षयाला भेटायला यायचा. दोघांच्या भेटीचे अनेक फोटो हे दोघेही चाहत्यांसोबत शेअर करत असत. त्यामुळे दोघांचेही नाते मैत्रिपलीकडे आहे हे अनेकांना समजलं होतं. मध्यंतरी दोघांच्या साखरपुड्याची देखील बातमी पसरली होती. मात्र त्यानंतर काही महिन्यातच दोघांचेही नाते संपुष्टात आले.

suyash tilak akshaya deodhar
suyash tilak akshaya deodhar

दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो देखील केलं. पण यांच्यातील ब्रेकअपचे कारण काय हे स्पष्ट होत नव्हते. त्यानंतर काही दिवसात सुयश आयुषी भावे सोबत आणि नंतर अक्षया हार्दिक जोशी सोबत विवाहबद्ध झाले. मात्र हे रिलेशन का संपुष्टात आले याबद्दल सुयशने नुकताच एक खुलासा केला आहे. सुयशने मीडियाला एक मुलाखत दिली यात तो अक्षया सोबतच्या ब्रेकअप बद्दल भरभरून बोलला. सुयश मुलाखतीत म्हणतो की, अक्षयाच्या अगोदरही मी हा अनुभव घेतला होता. त्यामुळे माझ्याबरोबर हे पहिल्यांदाच घडतंय असं मुळीच नव्हतं. आमची छान मैत्री होती, दोघेही एकमेकांना चांगले समजावून घेत होतो. पण जेव्हा तिच्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय हे तिला जाणवलं तेव्हा तिने मला एक मित्र म्हणून सांगितलं.

akshaya deodhar suyash tilak family
akshaya deodhar suyash tilak family

तेव्हा मी तिच्या मताचा आदर ठेवला आणि तिला जाऊ दिलं. मला वाटतं प्रेमाबद्दल जर एखादी व्यक्ती ती गोष्ट ताणून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती गोष्ट चुकीच्या मार्गाने जाते. त्यावेळी तुम्हाला हे जाणवत नाही, मलाही ते जाणवत नव्हतं. मला याबाबतीत कोणालाही दोषी ठरवायचं नाही. मला वाटतं की माझ्या आयुष्यातला तिचा प्रवास तेवढ्याच मर्यादेपर्यंत होता. त्यामुळे दोघांनीही वेगळा मार्ग निवडला. अक्षया सोबत ब्रेकअप झाल्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. मला मानसिक अस्वास्थ्य जाणवू लागले. माझा जास्त वेळ मी फिरण्यात घालवू लागलो. इंडस्ट्री व्यतिरिक्त लोकांच्या ओळखी वाढवू लागलो. मला यादरम्यान कामही करता येत नव्हते, कारण मी जे पात्र साकारणार त्या पात्राशी मला एकरूप होता येत नव्हतं.

त्यामुळे मी खूप कमी काम करायचो. फोनवरसुद्धा जवळच्याच व्यक्तींशी बोलायचो. मी कुठलीही गोष्ट टाकली तर लोकं त्याचा अर्थ आमच्या नात्याशी जुळवू लागले होते. पण मी यावर कमेंट करणे टाळत होतो. मला तिचा अनादर करायचा नव्हता. दरम्यान अक्षयासोबत आजही माझी चांगली मैत्री आहे आम्हाला एकमेकांसमोर यायचं असं मुळीच नाही. पण यानंतर माझे आयुषी सोबत प्रेम जुळले . प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे, प्रेम करत राहावं असं मला वाटतं. आज आयुषीकडे पाहून असं वाटतं की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते योग्यच घडतं असं मला वाटतं.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.