साधारण दोन आठवड्यापूर्वी मराठी मालिका विश्वातील अभिनेता सुमित भोकसे आणि मधुरा केळुस्कर यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याला मराठी मालिका सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. साखरपुड्यानंतर लगेच दोघांची लगीनघाई सुद्धा पाहायला मिळाली. दोन दिवसांपूर्वी सुमित आणि मधुराच्या हळदीचा आणि मेहेंदीचा थाट सजला होता. त्यावरून सुमित लवकरच लग्न करतोय अशी चर्चा पाहायला मिळाली. आज सुमित भोकसे आणि मधुरा केळुस्कर यांच्या लग्नाचा बार दणक्यात उडाला आहे. त्यांच्या लग्नाला प्रथमेश परब त्याच्या गर्लफ्रेंडसह हजर झाला होता. तर मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी लग्नाला उपस्थिती लावली होती.
सुमितच्या लग्नाचे काही खास व्हिडीओ आणि फोटो पाहून चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. सुमित भोकसे हा मराठी मालिका तसेच चित्रपट अभिनेता आहे. कॉलेजमध्ये असताना प्रथमेश परब, वेदांगी कुलकर्णी आणि भाग्यश्री मिलिंद हे त्याचे मित्र एकत्र एकांकिका, नाट्यस्पर्धा मधून सहभागी होत होते. या सर्वच कलाकारांनी पुढे जाऊन मराठी सृष्टीत स्वतःची ओळख बनवली. सुमित भोकसेने देखील अनेक मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दाखल घ्यायला लावली. नवरी मिळे नवऱ्याला, पाहिले न मी तुला, मुरांबा, इयर डाऊन अशा मालिकांमधून सुमित प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. मागील काळात प्रेक्षकांचे मनोरंजन थांबू नये म्हणून कलाकार मंडळी एकत्र राहत होती. यावेळी शशांक केतकर सोबत त्याची छान गट्टी जमली.
सतत काम करणारा खमका कलाकार म्हणून सुमितकडे पाहिले जाते. पाहिले न मी तुला या मालिकेतून त्यांची झालेली ओळख आजही मैत्रीच्या घट्ट नात्यात जीवापाड जपली आहे. मुरांबा मालिकेत हे दोघे पुन्हा एकत्र आले. एक नंबर या चित्रपटात सुमित एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. बोल्ड सीन्समुळ हा चित्रपट खूपच चर्चेत आला होता. कॉलेजमध्ये असताना नाटक, एकांकिका मधून आविष्कार या नाट्यसंस्थेशी तो जोडला गेला. अनेक मराठी नाटकातून काम करत असताना सुमित भोकसेला फोटोग्राफीचे वेध लागले. प्रथमेश परब सोबत सुमितला उर्फी चित्रपटात झळकण्याची नामी संधी मिळाली. यानंतर मालिका सृष्टीत सुमितने स्वतःची ओळख बनवली. नायकाचा मित्र, सहाय्यक अशा भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. नवरी मिळे नवऱ्याला मालिकेने सुमितला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती.