Breaking News
Home / जरा हटके / आमच्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं.. सुलोचना दिदींच्या जाण्याने आशा काळे भावुक
sulochana latkar asha kale
sulochana latkar asha kale

आमच्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलं.. सुलोचना दिदींच्या जाण्याने आशा काळे भावुक

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ४ जून रोजी दुःखद निधन झाले. काल संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना लाटकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सचिन पिळगावकर, महेश कोठारे, प्रिया बेर्डे, आदेश बांदेकर, जॅकी श्रॉफ, राजदत्त. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चिन्मई सुमित, आशा काळे, सुबोध भावे, मनवा नाईक यांनी हजेरी लावली होती. सचिन पिळगावकर यांनी सुलोचना दिदींच्या निधनाने आईच गमावली असल्याचे मीडियाशी बोलताना म्हटले. तर आदेश बांदेकर, सुबोध भावे, मनवा नाईक यांनीही भावुक प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळाल्या.

sulochana latkar asha kale
sulochana latkar asha kale

दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी सुलोचना दिदींच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी म्हटले होते की आता माझ्या  वाढदिवसाला तो फोन कधीच येणार नाही. सुलोचना दिदींच्या अंत्ययात्रे वेळी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनाही आपले अश्रू अनावर झाले. भावुक होऊन आठवणींना उजाळा देताना आशा काळे म्हणतात की, शांतपणे कोणाशीही न बोलता त्या गेल्या, किती खुलायचा चेहरा. प्रेमाने कसं वागायचं, संस्कार कसे द्यायचे, सभ्यपणाने कसं वागायचं. शिकवायचं म्हणून नाही शिकवलं त्यांच्यात होतं म्हणून आम्ही ते शिकलो. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही, आमच्या आयुष्याचं सोनं केलं त्यांनी, कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून. त्या काय, भालजी पेंढारकर काय, चारुदत्त सरपोतदार ही खूप गुणी माणसं.

asha kale sulochana didi
asha kale sulochana didi

भाग्य एवढंच आहे आम्हाला बघायला पण मिळाल्या आणि संवाद साधायला सुद्धा मिळालं. आणखी काय पाहिजे दुसरं, ही माणसं अलौकिक. कसं त्या जीवन जगल्या, दुसऱ्याच्या जीवनात आनंद दिला, प्रेम करणं माया करणं. म्हणजे त्या पडद्यावर आई होत्या तेव्हा त्या अभिनय करतच नव्हत्या, कारण प्रत्येक क्षणी त्या जगत होत्या आणि हेच त्यांच्याकडून आम्ही शिकलो. प्रत्येक सणाला त्या शुभेच्छा देत होत्या. एवढंच नाही तर माझ्या बहिणीची सुद्धा चौकशी करायच्या. माझ्या नवऱ्यावर त्यांनी भरभरून प्रेम केलं, हे भाग्य आम्हाला लाभलं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी त्यांनी जपल्या होत्या ही गोष्ट मुळीच सोपी नव्हती. मराठी तसेच बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच सुलोचना दीदींवर प्रेम करणाऱ्या श्रद्धांजली अर्पण केली.

About admin

चित्रपट, लघुपट, दूरचित्रवाणी मालिका, नाटक, एकांकिका, संगीत आणि या सर्वांसाठीच्या स्पर्धा आणि पारितोषिके यासारख्या विविध क्षेत्रात मराठी करमणूक विषयी एकाच छताखाली सर्व माहिती प्रकाशित करणे हा कलाकर.इन्फो या वेबसाईटचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.