चला हवा येऊ द्या हा शो स्नेहल शिदमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या शोच्या स्पर्धेमध्ये स्नेहलने सहभाग दर्शवला आणि तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत विजयाच्या ट्रॉफीवर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर स्नेहल शिदमचे नाव एक विनोदी अभिनेत्री म्हणून चर्चेत राहिले. बालपण अतिशय हलाकीच्या परिस्थितीत गेलेल्या स्नेहलला हे यश मिळालेले पाहून तिच्या वडिलांना मोठा आनंद झाला. आता तर ती घरात काय हवं काय नको बघण्यापासून ते गावी असलेल्या काकांच्या घराचंही लाईटबिल भरण्याचे काम करते. त्यामुळे स्नेहलच्या वडिलांना तिचा कायम अभिमान वाटतो.
फक्त आता तिने लग्न करून घरसंसार बघावा एवढीच त्यांची इच्छा आहे. नुकतेच फादर्स डे निमित्ताने स्नेहलच्या बाबांची मुलाखत घेण्यात आली. यात त्यांनी स्नेहलच्या लग्नासाठी कसा मुलगा हवा याचा उलगडा केलेला पाहायला मिळाला. स्नेहलच्या बाबांना जावई मुलगा म्हणून कोकणातलाच असावा अशी त्यांची ईच्छा आहे. आम्ही कोकणातली माणसं, इंजिनिअर सारखी स्नेहलसाठी आजवर अनेक स्थळं आली. पण आपल्याला एवढी मोठी माणसं अजिबात नको. तो मुलगा फक्त कोकणातला असावा अशी माझी अट आहे. याशिवाय स्नेहल ही ज्या क्षेत्रात काम करते त्या क्षेत्रात कसं काम करावं लागतं हे आपण पाहतोच. त्याने तिच्या कामाकडे पाहून तिला वेळोवेळी समजून घेतले पाहिजे. तिला, आमच्या कुटुंबाला आणि त्याच्या कुटुंबालाही त्याने समजून घ्यावे एकत्र राहावं.
स्नेहलचं लग्न झालं की मी गावी जायला मोकळा होईल. मला तिच्या लग्नाचीच चिंता आहे, आता तिचं २६ वय संपेल त्यामुळे तिने लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. स्नेहलचं लग्न झालं की तिच्या भावाचही आम्ही लग्न उरकून देणार आहोत. त्यानंतर मी माझ्या बायकोसोबत गावी राहायला मोकळा होईल. त्यावर स्नेहल शिदं देखील आपली इच्छा व्यक्त करते आणि म्हणते की, बाबा जसे म्हणतात की मी लवकर लग्न करावं. पण अजून किमान दोन वर्षे तरी मी त्यासाठी वाट पाहणार आहे. बाबा लग्न कर म्हणून सतत माझ्या मागे लागलेले असतात. लग्नाबद्दल माझ्या काही फारशा अपेक्षा नाहीत, पण मी पदवीधर आहे त्यामुळे मुलगा सुद्धा पदवीधर असावा असे स्नेहलचे म्हणणे आहे.