अनाथांची माई माई सिंधुताई सपकाळ यांनी हलाखीच्या परिस्थीवर मात करून गोर गरीब लहान मुला मुलींना सांभाळले. अपार कष्ट करून अगदी लोकांकडे पदर पसरून गरजेपुरते पैसे मागितले. त्या लहानग्यांना सांभाळले, उच्च शिक्षित केले. आज ती मुले विविध क्षेत्रात काम करीत आहे. मुलींची लग्न होऊन त्या देखील सुखाने नांदत आहेत. अलीकडेच सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भाष्य करणारा चित्रपट येऊन गेला. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सिंधुताईंची भूमिका साकारून हा भूतकाळ लोकांसमोर सजगपणे मांडला. आता माईंच्या जीवनाची ही गाथा तुम्हाला छोट्या पडद्यावर देखील अनुभवायला मिळणार आहे.

‘सिंधुताई माझी माई’ ही नवीन मालिका येत्या १५ ऑगस्ट पासून कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सिंधुताई माझी माई या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे जाणून घेऊयात. बालकलाकार अनन्या टेकवडे ही सिंधुताईंच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. अनन्या टेकवडे ही सोशल मीडिया स्टार आहे. तिच्या व्हिडीओंना चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. पुण्यात शालेय शिक्षण घेत असलेल्या अनन्याला नृत्याची आणि गाण्याची विशेष आवड आहे. सिंधुताई माझी माई मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे. अनन्या सह बिग बॉस फेम किरण माने, अभिनेत्री योगिनी चौक, अभिजित झाडे, आनंद भुरचंडी, शर्वरी पेठकर हे कलाकार मालिकेतून महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

सिंधुताई माझी माई या मालिकेचे दिग्दर्शन विठ्ठल डाकवे करणार आहेत. सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट आपण मोठ्या पडद्यावर अनुभवला होता. येणाऱ्या नवीन मालिकेच्या सुरुवातीला सिंधुताईंचे बालपण उलगडणार आहे. माईंचे बालपण कसे गेले हे पाहणे खरंच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. माईंनी समाजासाठी आयुष्य वेचले हे पुढील टप्य्यात पाहताना मालिकेने लीप घेतल्यानंतर माईंची ही भूमिका कोण साकारणार याची अधिक उत्सुकता निर्माण होते. त्याची प्रतीक्षा प्रेक्षकांना आतापासूनच लागलेली असणार आहे हे वेगळे सांगायला नको. तूर्तास या नवीन मालिकेसाठी बालकलाकार अनन्या टेकवडे आणि अन्य सर्वच कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.