Breaking News
Home / मराठी तडका / “पुष्पा” अल्लू अर्जुन रश्मीकाच्या आगामी  चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी..
pushpa movie shreyash talpade
pushpa movie shreyash talpade

“पुष्पा” अल्लू अर्जुन रश्मीकाच्या आगामी  चित्रपटात श्रेयस तळपदेची वर्णी..

येत्या १७ डिसेंबर २०२१ रोजी अल्लू अर्जुन अभिनित ‘पुष्पा द राईज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच लॉन्च झाला असून हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पहायला मिळते आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मादण्णा ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पुष्पा हा तेलुगू चित्रपट सुकुमार बनरेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. चंदन तस्कर विरप्पन यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जात आहे.

shreyash rashmika allu arjun pushpa movie
shreyash rashmika allu arjun pushpa movie

अल्लू अर्जुन या चित्रपटात दुहेरी भूमिका निभावताना दिसणार आहे. सुरुवातीला जंगलात चंदनाची तस्करी करणारा खलनायकाच्या भूमिकेत तसेच नायकाच्या भूमिकेतही तो दिसणार असल्याने ऍक्शन थ्रिलरने भरलेला हा चित्रपट सुपरहिट ठरणार अशी चर्चा आहे. चित्रपटातील सामी सामी हे गायिका सेंथिल गणेश राजलक्ष्मी यांच्या आवाजातील गाणे रिलीज अगोदरच सुपरहिट झाले आहे. या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मराठमोळा श्रेयस तळपदे हा देखील या चित्रपटाचा महत्वाचा भाग बनला आहे. पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेला श्रेयसने आपल्या आवाजात डब केलं आहे. त्यामुळे श्रेयस या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असलेला पाहायला मिळतो आहे. याअगोदर श्रेयसने ‘द लॉयन किंग’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सिम्बाचा बेस्ट फ्रेंड टीमॉनच्या पात्राला आपला आवाज दिला होता. आणि आता प्रथमच तो तेलुगू चित्रपटासाठी आणि तेही नायकाच्या मुख्य पात्राला आपला आवाज देणार आहे.

pushpa movie shreyash talpade
pushpa movie shreyash talpade

त्यामुळे श्रेयस सोबत त्याच्या तमाम चाहत्यांसाठी ही खूपच चांगली बातमी ठरत आहे. बाहुबली या चित्रपटामुळे शरद केळकर डबिंग आर्टिस्ट म्हणून खूपच लोकप्रियता मिळवताना दिसला होता त्यामुळे श्रेयस साठी देखील ही एक महत्वाची संधी असल्याचे मानले जाते. ‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेत श्रेयसने निशांत महाजनची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे श्रेयासला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. याच प्रसिद्धीमुळे त्याला मराठी हिंदी चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळत गेली. ईकबाल, गोलमाल अगेन, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल ३, पोस्टरबॉईज, हाऊसफुल २, ओम शांती ओम यासारख्या सुपरहिट चित्रपटातून श्रेयस कधी नायक तर कधी सहाय्यक भूमिका साकारताना दिसला. झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून तो पुन्हा एकदा मराठी मालिकेकडे वळला आणि छोट्या पडद्यावरचा यशवर्धन चौधरी ही भूमिका साकारून तो तमाम प्रेक्षकांना आपलासा करून गेला.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.