बहुचर्चित खुपते तिथे गुप्ते या शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. हा एपिसोड प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या शोची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात चांगलीच वाढलेली पाहायला मिळते. येत्या रविवारच्या खुपते तिथे गुप्तेच्या भागात श्रेयस तळपदेला आमंत्रित करण्यात आले आहे. श्रेयस तळपदे या मुलाखतीत आपल्या स्ट्रगलबद्दल बोलताना खूपच भावुक झालेला पाहायला मिळतो. आभाळमाया या मालिकेमुळे श्रेयस लोकप्रियता मिळवत होता. यातूनच त्याने आपली पाऊलं हिंदी चित्रपटाकडे वळवली होती.
हिंदी मराठी चित्रपट गाजवल्यानंतर माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चमकला. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे मोठे कौतुक करण्यात आले. सोबतच पुष्पा सारख्या चित्रपटातून डबिंग आर्टिस्ट म्हणून त्याला प्रसिद्धी मिळालेली होती. आपल्या या स्ट्रगल लाईफबद्दल प्रथमच तो खुपते तिथे गुप्तेच्या कार्यक्रमातून आपल्या भावना व्यक्त करणार आहे. यावेळी त्याने इथे एक वाईट अनुभव सुद्धा सांगितला. इकबाल चित्रपटाच्या अगोदर त्याला एका मालिकेच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. कॅमेऱ्यासमोर श्रेयस उभा राहिला तेव्हा कॅमेरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला. बराच वेळ झाला कॅमेरा दुरुस्त होत नसल्याने श्रेयस तिथे तसाच बसून होता. शेवटी कॅमेरामनने श्रेयसला उद्देशून तू पनवती आहे रे असे म्हणत त्याला टोला लावला.
हा किस्सा सांगताना श्रेयसला त्याचे अश्रू लपवता आले नाही. याच शोमध्ये पुढे जितेंद्र जोशीला एक व्हिडिओ कॉल करण्यात आला. खूप काही बोलण्यासारखं आहे असे म्हणत जितेंद्र श्रेयसच्या मैत्रीचा किस्सा सांगतो. माझ्याकडे काम नव्हतं म्हणून श्रेयसनेच मला सतीश राजवाडेकडे नेलं होतं असं जितेंद्र म्हणतो. पुढे तो असेही म्हणतो की, तूझी आई तुला म्हणाली होती की, नाटक करून काही होत नाहीये नोकरी कर कुठेतरी. तेव्हा आपण दोघेही स्वामी समर्थांच्या मठात गेलो होतो. दोघांनी स्वामींना प्रार्थना केली. पण त्यानंतर जे झालं ते अख्ख्या महाराष्ट्राने ,देशाने पाहिलं. हा किस्सा ऐकताना तर श्रेयसच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.
One comment
Pingback: माझा अपघात झाला तेव्हा त्या माणसाने मला उभं केलं रे.. जितेंद्र जोशीच्या कठीण काळातला किस्सा - kalakar