सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने आता सहा वर्षांचा लीप घेतलेला आहे. मालिकेत गौरीची साथ सोडून जाणारा जयदीप आता त्याच्या लेकीसोबत जीवन जगत आहे. आता त्यांची मुलगी लक्ष्मी सहा वर्षांची झालेली आहे. मात्र इतकी वर्षे उलटूनही जयदीप आणि आपली लेक कुठेतरी सुखरूप असतील असा विश्वास तिला आहे. त्यामुळे गौरी सतत या दोघांच्या शोधत आपले आयुष्य घालवत आहे. मालिकेला मिळालेले हे वळण प्रेक्षकांना मात्र अविश्वसनीय वाटत आहे. कारण अशा ट्विस्टची त्यांनी कल्पना देखील कधी केलेली नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्टार प्रवाहवरील बहुतेक मालिका अशाच ट्विस्टच्या शोधात असलेल्या पाहायला मिळतात.
मालिकेत आणखी एका बाल कलाकाराची एन्ट्री होत आहे. तर अभिनेत्री गायत्री दातार हिचे देखील मालिकेत आगमन झालेले आहे. अनन्याच्या भूमिकेत बालकलाकार श्रावी पनवेलकर झळकणार आहे. श्रावी ही मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आहे हे बहुतेक जणांना माहीत नसेल. आईवडील दोघेही कलाकार असलेल्या श्रावीला अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहेत. त्यामुळे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून तिचे छोट्या पडद्यावर पदार्पण होत आहे. श्रावी ही अभिनेत्री अंकिता जोशी पनवेलकर हिची कन्या आहे. अंकिता सध्या पिंकीचा विजय असो या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहे. शुभमंगल ऑनलाइन, बाळू मामाच्या नावानं चांगभलं अशा मालिकांमधून अंकिता महत्वाच्या भूमिका साकारल्या.
बाळू मामांची आई म्हणजेच सुंदराबाईंची भूमिका अंकिताने चांगलीच गाजवली होती. मालिकेतून तिची एक्झिट झाली त्यावेळी अनेकांनी तिला खूप मिस करणार अशी प्रतिक्रिया दिली होती. अंकिताचा नवरा ओमकार पनवेलकर हा अभिनेता तसेच कार्यकारी निर्माता म्हणून सिनेसृष्टीत कार्यकरत आहे. जय जय स्वामी समर्थ मालिकेसाठी तो काम करतो आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत श्रावी देखील अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून नशीब आजमावू पाहत आहे. श्रावी तिच्या आईसोबत डान्सचे अनेक रील बनवते; यातूनच तिने मालिकेसाठी ऑडिशन देण्याचे ठरवले. अनन्याच्या भूमिकेसाठी श्रावीची निवड करण्यात आल्याने ती आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक आहे. या पहिल्या वहिल्या मालिकेसाठी श्रावी पनवेलकर हिला मनःपूर्वक शुभेच्छा.