Breaking News
Home / जरा हटके / सुयश टिळकनंतर ही अभिनेत्री लवकरच करणार लग्न.. गोव्याच्या बीचवर केले प्रिवेडिंग फोटोशूट
rasika sunil prewedding shoot
rasika sunil prewedding shoot

सुयश टिळकनंतर ही अभिनेत्री लवकरच करणार लग्न.. गोव्याच्या बीचवर केले प्रिवेडिंग फोटोशूट

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील आता लवकरच लग्न करणार आहे. विशेष म्हणजे मालिकेतील शनया हे पात्र विरोधी भूमिका साकारत असले तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. आता लवकरच शनया खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे. नुकतेच रसिका आणि आदित्य हे दोघेही गोव्याला दाखल झाले आहेत तिथल्या समुद्र किनारी त्यांनी शूट केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

rasika sunil prewedding shoot
rasika sunil prewedding shoot

रसिकाने if you see the signs, you know what’s coming! Wait for it! असे कॅप्शन देऊन हातावर मेहेंदी असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. रसिकाच्या ह्या व्हिडीओ वरून हे ती लवकरच आदित्य बिलागी सोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या ह्या प्रिवेडिंग फोटोशूटला तिच्या तमाम चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. रसिका आणि आदित्य यांच्या घरी गेल्या काही दिवसांपासून लग्नाची लगबग सुरू होती. काही दिवसांपूर्वी तिने ठाणे येथील शिवशाही पैठणी या प्रसिद्ध दुकानाला भेट दिली होती आणि लग्नाच्या बस्त्याची खरेदी देखील केली होती. त्यामुळे रसिका आणि आदित्य हे दोघेही लवकरच लग्न अशी चर्चा पाहायला मिळाली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिके अगोदर तिने गर्लफ्रेंड, पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. व्यावसायिक नाटक साकारत असताना रसिकाने टीव्ही वरील लक्स झकास हिरोईन कॉन्टेस्टमध्ये पार्टीसिपेट केले होते.

rasika with adi bilagi pre wedding
rasika with adi bilagi pre wedding

तुम बिन मोहें… या व्हिडीओ अल्बममध्ये गायन सोबतच त्यात कामही केले होते. त्यामुळे रसिका उत्तम गायिका देखील आहे हे प्रेक्षकांच्या समोर आले. अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात कार्यरत असलेली रसिका आता लवकरच लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी यूएसए स्थित आदित्य बिलागी याने रसिकाला रोमँटिक डेटवर नेऊन प्रपोज केले होते. रसिकाने देखील त्याने केलेल्या प्रपोजला आपला होकार कळविला होता. आदित्य बिलागीला डेट करण्या अगोदर रसिका ही अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्या प्रेमात पडली होती. मात्र त्यांच्यात ब्रेकअप झाला आणि सिद्धार्थ चांदेकरने मिताली मयेकर सोबत लग्नगाठ बांधली. मधल्या काळात माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ब्रेक घेतल्यावर रसिका पुढील शिक्षणासाठी यूएसला दाखल झाली इथेच तिची आदित्य बिलागी सोबत मैत्री झाली आणि ही मैत्री आता लवकरच लग्नगाठेपर्यंत येऊन पोहोचली आहे.

beautiful shanaya rasika
beautiful shanaya rasika

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.