Breaking News
Home / मराठी तडका / यशोदा मालिकेतली सखू प्रेक्षकांच्या पसंतीस.. या चिमुरडीने साकारली आहे भूमिका
ovee karmarkar yashoda serial
ovee karmarkar yashoda serial

यशोदा मालिकेतली सखू प्रेक्षकांच्या पसंतीस.. या चिमुरडीने साकारली आहे भूमिका

झी मराठी वाहिनीवरील यशोदा गोष्ट श्यामच्या आईची ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांनी आजवर अनेक मनोरंजक मालिकांचे दिग्दर्शन करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. झी मराठीवरील उंच माझा झोका, स्वामिनी, राधा प्रेमरंगी रंगली, या सुखांनो या, वहिनीसाहेब अशा दर्जेदार मालिकांचे दिग्दर्शन त्यांनीच केले होते. मालिकेत वरदा देवधर हिने यशोदाची म्हणजेच छोट्या बयोची प्रमुख भूमिका साकारली आहे. मालिकेत छोट्या बालकलाकारांची धमालमस्ती प्रेक्षकांना विशेष भावली आहे. छोट्या बयोचे लग्न होऊ नये म्हणून, तिची भावंडं आणि सोबतच तिचा होणारा नवरा सुद्धा देवी आईकडे साकडं घालताना पाहायला मिळाली.

ovee karmarkar yashoda serial
ovee karmarkar yashoda serial

त्यात चिमुरड्या सखूची धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सोबत रोहिणी हट्टंगडी, नयना आपटे, अभिजीत चव्हाण, गुरुराज अवधानी, ऋग्वेदी प्रधान, अनिल गवस, दिनेश कानडे. सृष्टी पगारे, अशोक समेळ, तारका पेडणेकर असे हरहुन्नरी कलाकार मालिकेला लाभले आहेत. देवी आईने विरोधात कौल दिलेला असल्याने ही सखू चक्क सगळ्यांचे डोळे मिटलेले असताना गुपचूप जाऊन देवीचा कौल बदलते. आपण चुकलोय हे तिला सांगायचे असते, मात्र कोणीही त्यांकडे लक्ष्य देत नाही. जे पाहून ती स्वतःच्याच चुकीवर विचार करायला लागते. चिमुरड्या सखूचा हाच निरागसपणा प्रेक्षकांना खूप भावला आहे. सखूचे बोबडे बोलणे आणि मध्येच गमतीशीर वक्तव्य करणे अनेकदा अडचणीत आणणारे ठरते. मात्र तिची ही धमाल पाहायला प्रेक्षकांना मनोरंजनात्मक वाटते.

ovee karmarkar
ovee karmarkar

सखूची भूमिका साकारली आहे बालकलाकार ओवी करमरकर हिने. ओवी ही अतिशय गुणी बालकलाकार आहे. सेटवर देखील तिची ही धम्माल हलकं फुलकं वातावरण ठेवायला मदत करते. ओवी शाळेतही जाते, लवकरच तिच्या शाळांत परीक्षा होणार आहेत. त्यामुळे सेटवरच तीच्या अभ्यासाची तयारी असते. ओवी डोंबिवली येथे वास्तव्यास आहे. तिचे वडील विपुल करमरकर आणि आई धनदा हे नेहमी सेटवर हजेरी लावतात. ओवीच्या आई छंद म्हणून गायनाचे व्हिडीओ टाकत असतात. मालिकेच्या ऑडिशनला ओवीने मनं जिंकून घेतल्याने तिला मालिकेत सगळ्यात छोट्या भूमिकेसाठी निवडण्यात आले. दिग्दर्शक म्हणेल तसा ती अभिनय करत असल्याने सेटवर तिचं मोठं कौतुकही होत असतं. ओवी भविष्यात या क्षेत्रात नक्कीच यश मिळवणार असा विश्वास वाटतो.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.