मन उडू उडू झालं मालिकेतील कार्तिक साळगावकर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. ही भूमिका ऋतुराज फडकेने साकारली होती. ऋतुराज एक गुणी अभिनेता आहे. त्याच्या या खडतर प्रवासाबद्दल त्याने नुकत्याच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. या स्ट्रगलच्या काळात ऋतुराजला महेश कोठारे यांनी मोठी मदत केली. यावेळी ऋतुराज हा किस्सा सांगताना भावुक झाला. ऋतुराज म्हणतो की, मी कल्याणला राहत होतो गोरेगावला काम मिळण्यासाठी स्ट्रगल करत होतो.
माझ्या बँकेच्या खात्यात त्यावेळी फक्त १५० ते २०० रुपये होते. माझ्याकडे जेवायला सुद्धा पैसे नव्हते. मी हे आईला सुद्धा सांगू शकत नव्हतो. स्ट्रगल करणं ऑडिशन देणं हे कठीण असतं एका कलाकारासाठी, आणि मी तो अनुभव घेतलेला आहे. तुमच्या कामाचा चेक कधी येईल हे माहीत नाही, जेवायचं खायचं काय हे माहीत नाही. मी ही गोष्ट महेश कोठारे यांना सांगितली. त्यांनी ५ मिनिटं सुद्धा वाट पाहिली नाही लगेचच त्यांनी माझ्या खात्यात ५० हजार रुपये टाकले. तुम्ही काम केल्यानंतर परत पाच सहा महिने कामासाठी पुन्हा स्ट्रगल करावा लागतो.
आपण ऑडिशन देतो, प्रयत्न करतो मात्र नशिबावर सुद्धा हे अवलंबून असतं. पण मला माझ्या शेवटच्या सिरियलने हे सिद्ध करून दिलं. मन उडू उडू झालं ही माझी मालिका. या मालिकेतील कार्तिक साळगावकरच्या भूमिकेने मला ओळख मिळाली आहे. ऋतुराज फडके हा कार्तिकच्या भूमिकेमुळे ओळखू लागला. एकदा प्रवासात असताना त्याच्या बाजूला एक आजी बसल्या होत्या. तेव्हा त्या आजीने कार्तिकच्या भूमिकेमुळे त्याला मार दिला होता. कार्तिकची भूमिका खलनायकाची होती. मला या भूमिकेसाठी शिव्या खायला मिळतात असे तो सांगतो. अभिनेता ऋतुराज फडके याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.