Breaking News
Home / जरा हटके / माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराच्या बहिणीचा विवाह संपन्न.. बहिणही आहे कलाक्षेत्रात सक्रिय
ruchira jadhav sister rutuja wedding mazi chaku
ruchira jadhav sister rutuja wedding mazi chaku

माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराच्या बहिणीचा विवाह संपन्न.. बहिणही आहे कलाक्षेत्रात सक्रिय

अभिनेत्री रुचिरा जाधव हिच्या सख्ख्या बहिणीचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. रुचिराने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत मायाची भूमिका साकारली होती. तसेच वेबसिरीज आणि टेलिव्हिजन वरील विविध मालिकांमधून रुचिराने आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. तिचे आकर्षक फोटो तसेच मजेशीर रील यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. रुचिराचे फक्त बोल्ड मॉडर्न लूक फोटो इतकेच साडी मधील आकर्षक फोटो देखील नेहमीच चर्चेत असतात.

rutuja jadhav wedding photos
rutuja jadhav wedding photos

तुझ्या वाचून करमेना या मालिकेत रुचिराने टेलिव्हिजन वर दिमाखदार पदार्पण केले होते. कलर्स मराठीवरील या मालिकेतून तिने नुपूरची भूमिका साकारली होती. शुद्ध देसी या युट्युब चॅनलवरील ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेबसिरीज खेरीज ‘प्रेम हे’ झी युवा, ‘बे दुणे दहा’ स्टार प्रवाह, ‘माझे पती सौभाग्यवती’ झी मराठी अशा आणखी काही मालिकेतून ती प्रेक्षकांसमोर आली होती. ऋतुजा जाधव ही रुचिरा जाधवची सख्खी बहीण आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ३ जानेवारी रोजी ऋतुजा आणि अंकित ढगे यांचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुडा निमित्त मराठी कलाकारांनी या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. साखरपुड्यानंतर डिसेंबर महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध झाले आहेत. अंकित ढगे शेफ आणि एक सोशल वर्कर आहे, सध्या तो मुंबईत स्थायिक आहे.

rutuja jadhav weds ankit dhage
rutuja jadhav weds ankit dhage

ऋतुजा आपल्या बहिणीप्रमाणेच कला क्षेत्राशी निगडित आहे एक फॅशन मॉडेल म्हणून ती मॉडेलिंग क्षेत्रात आपला जम बसवताना दिसत आहे. फ्लेमिंगो ह्या प्रसिद्ध फिटनेस ब्रँड प्रॉडक्ट्ससाठी तिने काम केले आहे. ह्या ब्रँडचा ब्रँड अँब्यासिडर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आहे. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना या दोघी बहिणींनी कला क्षेत्रात बसवलेला आपला जम खूपच कौतुकास्पद म्हणावा लागेल. बहिणीच्या लग्नाचे खास फोटो रुचिराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऋतुजा जाधव आणि अंकित ढगे या नवदाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.​​

ruchira jadhav sister rutuja wedding
ruchira jadhav sister rutuja wedding

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.