मराठी बिग बॉसच्या घरात रोहित शिंदे आणि रुचिरा जाधव या कपलने प्रेक्षकांची मनं जिंकलेली पाहायला मिळाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही या घरात एकमेकांची काळजी घेताना दिसले आहेत. एवढेच नाही तर रोहित हताश झाला होता त्यावेळी रुचिराने त्याला धीर देण्याचे काम केले होते. रुचिरा आणि रोहित हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात त्यांच्या या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. काही दिवसांपूर्वीच रोहीतने मलेशया येथे झालेल्या मॅन ऑफ द ग्लोब या स्पर्धेसाठी सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत तो सेकंड रनर अप ठरला.
त्यामुळे बिग बॉसच्या घरात या दोघांना एन्ट्री देण्यात आली. जसजसे ह्या घरात एक एक दिवस पुढे जात आहेत तसतसा रोहितचा रुचिरा बाबतचा हक्क प्रेक्षकांना जाणवू लागला आहे. रुचिराबाबत ती पझेसिव्ह भूमिका घेत असल्याचे नुकतेच एका घटनेमुळे समोर आले आहे. रुचिरा घरातील इतर सदस्यांसोबत वर्कआऊट करायला निघाली होती त्यावेळी रुचिराने योगा पॅन्ट आणि क्रॉप टॉप घातला होता. तेव्हा रोहितने तिला हाक मारली आणि योगा करायला जातीयेस तर टी शर्ट घाल असे सांगितले होते. तेव्हा रुचिराने बिग बॉसच्या घरात येताना केवळ मोजकेच टी शर्टस आणले होते आणि आता माझ्याकडे घालायला टी शर्ट नाही असे म्हटल्यावर रोहितने यावर नाराजी दर्शवली होती.
‘तुझी मर्जी’ असे रुचिराला म्हणतात, रोहितची यावर नाराजी स्पष्ट दिसून आली. रुचिराला देखील रोहितची नाराजी जाणवली आणि मी काळजी घेईल असे उत्तर त्याला दिले. त्यानंतर योगेश आणि निखिल सोबत योगा करताना रोहित तिथेच उभा राहिला. रोहितच्या या वागण्यामुळे रुचिराला थोडेसे अवघडल्यासारखे वाटले असणार हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. पुढे जाऊन या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. रोहित शिंदे ह्या आठवड्यात कॅप्टनसीचा टास्क जिंकला आहे. त्यामुळे ह्या आठवड्यात त्याच्यावरच्या एलिमीनेशनची टांगती तलवार काहीशी दूर झाली आहे.
रोहितने बिग बॉसच्या घरात इतर सदस्यांसोबत चांगली मैत्री बनवली आहे. अपूर्वा, रोहित, योगेश , रुचिरा या सारखी तगडी टीम त्यांच्याकडे असल्याने आणखी थोडे दिवस तरी ते वेगवेगळ्या टास्कमधून प्रेक्षकांची मनं जिंकणार आहेत. मात्र जसजसे एलिमीनेशन जवळ येत जाईल तसतसे या मैत्रीत फूट पडेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. बिग बॉसच्या घरात देखील अशा टास्कमुळे एकमेकांमध्ये भांडणं झालेली आहेत.