रितेश देशमुख ने मीडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. मुलाखतीत त्याला खाजगी आयुष्यबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. अशा अनेक मुलाखतीतून रितेश सर्वांचा आदर राखतो, सर्वांना आदराने तुम्ही, आपण असेच बोलतो. अगदी आपल्या मुलांना देखील तो एकेरी नावाने कधीच हाक मारत नाही, हे तुम्ही देखील अनेकदा अनुभवले असेलच. ह्याच मुद्द्यावर रितेशला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा रितेश सांगतो आमच्या संपूर्ण कुटुंबात सगळ्यांचा असाच मान राखला जातो. माझे आजोबा आम्ही लहान असल्यापासूनच एकेरी नावाने कधीच हाक मारत नाहीत.
आमचे काका देखील आम्हाला तुम्ही असेच म्हणत आलेत. मी सुद्धा माझ्या मुलांना कधी एकेरी नावाने हाक मारत नाही. आमच्या कुटुंबात ही परंपरा आम्ही सुद्धा आत्मसात करत आणि जपलेली आहे. अशा आवो जावो बोलण्याने समोरच्या व्यक्तीचा मान राखला जातो. मात्र मला एका हिंदी भाषिक वार्ताहराने हाच प्रश्न विचारला की, तुम्ही सगळ्यांना एकेरी नावाने कधीच हाक मारत नाहीत. मात्र आईला तू असे का म्हणतो? तेव्हा मी उत्तर दिले होते की, तुम्ही भगवान शंकरजी, रामजी, गणेशजी असे म्हणता. आम्ही सुद्धा देवाचे एकेरी नाव घेतो. देवाची आणि आईची जागा एकच आहे, म्हणून देवाला आणि आईला सुद्धा तू असेच मी मानतो. रितेशच्या या उत्तराने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत.
दिवाळी निमित्त आईची जुनी साडी वापरून मुलांसाठी बनविलेले निळ्या रंगाचे पोशाख चाहत्यांना खूपच आवडले होते. या मुलाखतीतून तो कुटुंबियांशी किती क्लोज आहे याची प्रचिती पाहायला मिळते. वेड चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर रितेशचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. रितेश प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने विश्रांतीसाठी हॉटेलमध्ये झोपला होता. दोन्ही मुलं उठवायला आली, आजी आली आहे हे कळताच सर्वात आधी रितेश आईच्या पाया पडला. जेनेलियाने दिलेले वाढदिवसाचे हे खास सरप्राईज पाहून तो खूपच खुश झाला होता. सध्या वेड चित्रपटाचे यश आणि प्रतिसाद पाहून जेनेलिया आणि रितेश खूप भारावून गेले आहेत. रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल दोघांनी मनापासून आभार मानले आहेत.