स्टार प्रवाहवरील अबोली या मालिकेत काही दिवसांपूर्वीच अबोली आणि अंकुशच्या लव्ह स्टोरीमध्ये पल्लवीची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. अंकुश त्याची स्मृती गमावतो यात मालिकेने एक वर्षांचा लीप घेतलेला असतो. अंकुशची स्मृती परत येण्यासाठी अबोली प्रयत्न करत आहे. या मालिकेत सचित राजे आणि पल्लवीच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या चिमुरड्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मालिकेत शार्दूल राजेची भूमिका साकारणाऱ्या चिमुरड्याचे नाव आहे रेयान वावरे. मालिकेतला रेयानचा निरागस अभिनय प्रेक्षकांना खूप भावला आहे.
रेयान हा मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराचा मुलगा आहे. मराठी चित्रपट गायक हर्षवर्धन वावरे याचा तो मुलगा आहे. दगडी चाळ, वृंदावन, देवा, कागर, यंटम, टाईमपास ३ अशा चित्रपटाची गाणी त्याने गायली आहेत. कस्तुरी ही हर्षवर्धनची पत्नी. दोघांनाही लहानपणापासूनच म्युजीकची आवड होती. कस्तुरीची आई या म्युजिक टीचर होत्या तर हर्षवर्धनची आई गायिका होत्या. या दोघींची खूप जुनी मैत्री होती. गायिका आणि म्युजिक टीचर म्हणून या दोघींची ओळख झाली तिथेच गाण्याच्या निमित्ताने हर्षवर्धनचे कस्तुरीच्या घरी येणे जाणे झाले. याच माध्यमातून हर्षवर्धन आणि कस्तुरीची ओळख झाली. एका मालिकेच्या गाण्यानिमित्त हे दोघे एकत्रित आले तेव्हा त्यांच्यात प्रेम जुळून आले.
हर्षवर्धन आणि कस्तुरी यांनी त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. रेयानला देखील गाण्याची आवड आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या दुसऱ्या पर्वासाठी रेयान वावरे याने ऑडिशन देखील दिली होती. त्यानंतर स्टार प्रवाहच्याच टीमने त्याच्या कला गुणांना हेरले आणि अबोली मालिकेसाठी त्याची निवड केली. अबोली ही रेयानची पहिलीच मराठी मालिका ठरली आहे. या मालिकेतून तो अभिनय क्षेत्रात आपले नशीब आजमावत आहे. रेयानच्या अभिनय प्रवासात मालिकेच्या टीमकडून खूप चांगला सपोर्ट मिळत आहे. दिसायला अतिशय क्युट असलेला रेयान वावरे त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. अबोली मालिकेसाठी रेयान वावरे या चिमुरड्याला खूप खूप शुभेच्छा.