मराठी चित्रपट तसेच हिंदी मालिका, चित्रपट अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्या आईचे आज दुःखद निधन झाले आहे. रेशम आपल्या आईच्या खूप जवळ होती. आयुष्यातील आपल्या अनेक कठीण प्रसंगात आईने भक्कम साथ दिली, मला स्ट्रॉंग बनवलं हे ती आवर्जून म्हणताना दिसली. जिवलगा चित्रपटातून रेशमने नायिका म्हणून मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले होते. अभिनयाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिला बाजीगर सारख्या बॉलिवूड चित्रपटातून काम मिळाले. यातच तिने संजीव सेठ सोबत लग्नही केले. मानव आणि रिशिका या दोन अपत्यांच्या जन्मानंतर दहा वर्षानंतर तिने संजीवपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
आपल्या आईने संकट काळात खूप मोठी साथ दिली असे ती नेहमी म्हणते. शूटिंगला कामानिमित्त जाताना आपल्या मुलांचा सांभाळ आईनेच केला होता. त्यामुळे आपल्या आईच्या निधनाने रेशम खूपच खचून गेलेली आहे. आई तुझा फोन मला परत कधीच नाही येणार या गोष्टीवर माझा अजून विश्वास नाही बसत. तू मला खंबीर बनवलंस आणि मी कायम अशीच राहील असा तुला विश्वास देते. तुझी कायम आठवण येणार मला, खूप खूप प्रेम. असे म्हणत रेशमने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भार्गवी चिरमुले, स्मिता गोंदकर, क्रांती रेडकर, चैत्राली गुप्ते, मानसी नाईक, तेजस्विनी प्रधान. सुकन्या कुलकर्णी या मराठी सेलिब्रिटींसह डेलनाझ इराणी, लता सबरवाल, सुप्रिया शुक्ला या हिंदी सेलिब्रिटींनी रेशमला दुःखातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी बिग बॉसच्या पहिल्या सिजनमध्ये सहभागी होऊन रेशमने प्रसिद्धी मिळवली होती. गेल्या ८ वर्षांपासून रेशम आणि संदेश कीर्तिकर एकमेकांच्या प्रेमात आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई या हिंदी मालिकेत रेशम द्वारकाबाई होळकर हे पात्र साकारताना दिसली. लोच्या झाला रे चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली. संजीव सेठ सोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर अभिनेत्री लता सबरवाल सोबत त्याने लग्न केले. मात्र संजीव आणि लता दोघेही या दोन्ही मुलांना आपलीच मुलं समजतात, त्यांचा सांभाळ करतात. रेशमच्या प्रत्येक निर्णयामागे तिच्या आईने तिला कायम खंबीर साथ दिली होती, त्यामुळे रेशम आईच्या निधनाने खचून गेली आहे. या दुःखातून तिला सावरण्यास बळ मिळो अशी भावना मराठी सेलिब्रिटींकडून व्यक्त करण्यात येत आहे.