Breaking News
Home / मराठी तडका / अखेर तेजस्विनी लोणारीने सोडलं मौन.. बिग बॉसच्या फिनालेबद्दल केला मोठा खुलासा
tejaswini lonari big boss
tejaswini lonari big boss

अखेर तेजस्विनी लोणारीने सोडलं मौन.. बिग बॉसच्या फिनालेबद्दल केला मोठा खुलासा

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनला प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नाही असे बोलले जात होते. कलर्स मराठी वाहिनीचा टीआरपी मात्र या शोने वाढवलेला पाहायला मिळतो आहे. टीआरपीचा अहवाल नुकताच समोर आला असून बिग बॉसचा पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली आहे. परिणामी झी मराठी वाहिनीचा टीआरपी देखील घटला आहे. येत्या काही दिवसातच बिग बॉसचा फिनाले प्रेक्षकांच्या समोर दाखल होत आहे. आरोह वेलणकर, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, राखी सावंत, किरण माने हे सात सदस्य बिग बॉसच्या घरात आहेत.

tejaswini lonari big boss
tejaswini lonari big boss

यातील दोन सदस्यांना लवकरच हे घर सोडावे लागणार आहे. आरोह वेलणकर ह्या आठवड्यात कॅप्टन झाला असल्याने त्याला ह्या आठवड्यात सेफ झोनमध्ये राहता आले. त्यामुळे ह्या आठवड्यात कोणता सदस्य बेघर होणार याची जास्त उत्सुकता आहे. मात्र या सर्वांच्या जोडीला फायनलमध्ये तेजस्विनी लोणारी असायला हवी होती असे मत प्रेक्षकांनीच नव्हे तर घरातील सदस्यांनी देखील मान्य केले आहे. बिग बॉसच्या चावडीवर प्रत्येक सदस्याने तेजस्विनी टॉप ५ मध्ये आपल्या सोबत असायला हवी हे मत व्यक्त केले होते. आपल्यावरचे हे प्रेम पाहून तेजस्विनीने एक पोस्ट लिहिली आहे. यात तिने एक मोठा खुलासा देखील केलेला दिसून येतो. मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये तेजस्वीनी लोणारी हिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.

tejaswini big boss
tejaswini big boss

तेजस्विनी ही सर्वच सदस्यांमध्ये स्ट्रॉंग प्लेअर आहे असे एकमत चाहत्यांमध्ये झाले होते. परंतु टास्क दरम्यान दुखापत झाल्यामुळे तेजस्विनीला बिग बॉसच्या घरातून बाहेर निघावे लागले होते. तेव्हा बिग बॉसच्या या निर्णयावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. तिला पुन्हा घरात घ्यावे असा ट्रेंड तिच्या चाहत्यांनी सुरू केला होता. आता तर तेजस्विनी पूर्णपणे बरी झाल्याचेही एका व्हिडिओत दिसून आले. तेजस्विनीच्या हाताचे बँडेज काढण्यात आले असल्याने ती पुन्हा बिग बॉसच्या घरात येईल असे बोलले जाऊ लागले. मात्र या चर्चांवर आता स्वतः तेजस्विनीनेच पूर्णविराम दिलेला आहे. आपल्या या पोस्टमध्ये तेजस्वीनी म्हणते की, बिग बॉसची ट्रॉफी जिंकता आली नसली तरी, प्रेक्षकांची आणि प्रतिस्पर्ध्यांची मने जिंकता आली ह्याचा आनंद खूप मोठा आहे.

दुर्दैवाने टॉप ५ मध्ये मी नसणार आहे. पण माझ्या शुभेच्छा मात्र माझ्या टॉप ५ मधील प्रतिस्पर्धी मित्रांसोबत असतीलच. माझ्यासाठी प्रेक्षकांनी दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंबा खूप मोलाचा आहे. प्रेक्षक इतकं भरभरून प्रेम करतील असेल मी कल्पनेत सुद्धा विचार करू शकले नाही. तुमच्या ह्या प्रेमाबद्दल माझ्याकडे शब्दच नाहीत. असे म्हणत तिने घरातील टॉप ५ सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या खुलास्यानंतर ती बिग बॉसच्या घरात परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या चर्चांना आता तिनेच या पोस्टमधून पूर्णविराम दिलेला आहे.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.